शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात :- आ. संग्रामभैय्या जगताप

 शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात :- आ. संग्रामभैय्या जगताप



अहमदनगर (प्रतिनिधी) :- शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदनगर शहरात होत असलेल्या १५ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी दिली. 




अहमदनगर शहरातील वै. पं. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात पद्मश्री कविवर्य ना.धो. महानोर साहित्यनगरीमध्ये संपन्न होणाऱ्या या दोन दिवसीय साहित्य संमेलनात लोकजागर साहित्य यात्रा, सावित्रीबाई फुले पुस्तक मेळा, शाहिरी जलसा, उद्घाटन, सेलिब्रिटी मुलाखत, कवी संमेलन, कथाकथन, प्रकट मुलाखत, संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या कवितांवर आधारित 'माझ्या श्वासात तू'.... हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम, महाराष्ट्राच्या, लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारा महाराष्ट्राची लोककला हा दिमाखदार कार्यक्रम, परिसंवाद, समारोप व पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 


शनिवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून लोकजागर साहित्य यात्रेस प्रारंभ होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले पुतळा, राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा मार्गे ही लोकजागर साहित्य यात्रा गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या पद्मश्री कविवर्य ना. धो. महानोर साहित्य नगरीत पोहोचणार आहे. 



या लोकजागर साहित्य यात्रेमध्ये स्वागताध्यक्ष, संमेलनाध्यक्ष,  प्रमुख अतिथी, माजी संमेलनाध्यक्ष कवी इंद्रजित भालेराव, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लेखक, साहित्यिक, कवी, साहित्यरसिक तसेच नगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. फुलांनी सजवलेल्या लाकडी पालखीमध्ये भारतीय संविधान, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे ग्रंथ तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची ग्रंथसंपदा ठेवण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये तुतारी पथक, अब्दागिरी पथक, वासुदेव पथक, पिंगळा पथक,  गोंधळ पथक, शाहिरी पथक, धनगरी ढोल पथक, विविध शाळा महाविद्यालयांचे लेझीम पथक, झांज पथक, ढोल पथक व पारंपारिक वाद्यांचे पथक सहभागी होणार आहेत. 


भाई वैद्य विचारपिठावर शाहीर भारत गाडेकर, शाहीर डॉ. शेषराव पठाडे, शाहीर दिलीप शिंदे, शाहीर वसंत डंबाळे आणि सहकाऱ्यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११ वा. महाराष्ट्राचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून उद्घाटन कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर, स्वागताध्यक्ष आ. संग्राम भैय्या जगताप, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. आ. शिवाजीराव कर्डिले, विधान परिषद सदस्य अरुण काका जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे, माजी संमेलनाध्यक्ष कवी इंद्रजीत भालेराव, उपमहापौर गणेश भोसले, मनपा आयुक्त पंकज जावळे, एल अँड टी चे मुख्य व्यवस्थापक अरविंद पारगावकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी ॲड. बन्सी सातपुते आदी उपस्थित राहणार आहेत. 


उद्घाटनानंतर दुपारी ३ वा. माजी संमेलनाध्यक्ष चित्रपट, गीतकार, कवी, बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शायर, अजीम नवाज राही व कवियत्री शर्मिला गोसावी या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कवी संमेलनात वी.रा. राठोड, नारायण पुरी, भरत दौंडकर, डॉ. विशाल इंगोले, नितीन चंदनशिवे, हनुमंत चांदगुडे, रवींद्र मालुंजकर, अबेद शेख, माधुरी चौधरी, संजय चौधरी, शशिकांत हिंगोनेकर, अंजली दिक्षित, प्रा. शशिकांत शिंदे, डॉ. कमर सुरुर, डॉ. संजय बोरुडे, गणेश मरकड, सय्यद अल्लाउद्दीन, ज्योती तोटेवार, चंद्रकांत पालवे, अमोल घाटविसावे, संजय पठाडे, बबन धुमाळ, हुमान आतार, माधुरी मरकड, ज्योती सोनवणे, चंद्रकांत कर्डक, विजयकुमार मिठे आदी कवी सहभागी होणार आहेत. 


सायंकाळी ५ वा. डॉ. संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध कथाकथनकार विलास सिंदगीकर (लातूर), भास्कर बडे (बीड) हे कथाकथनकार सहभागी होणार आहे. सायंकाळी ६ वाजता स्वागताध्यक्ष आ. संग्राम भैय्या जगताप यांची प्रकट मुलाखत होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार तथा अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, पत्रकार मुरलीधर कराळे, पत्रकार बंडू पवार आदी त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. सायंकाळी ७ वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या गीत रचनांवर आधारित 'माझ्या श्वासात तू' हा कविता, गझल व चित्रपट गीतांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. रुद्र प्रोडक्शन प्रत्सुत गायक - संगीतकार अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना गायिका अंजली मराठे, वैशाली राजेश, स्वाती कुलकर्णी आणि सहकारी सादर करणार आहेत. 


रात्री ९ वा. बी. आर. इव्हेंट्स प्रस्तुत महाराष्ट्राची लोककला हा लोकसंस्कृतीच्या पाऊल खुणा जपणारा दिमागदार कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील पारंपारिक लोक कलावंत, वासुदेव, पिंगळा जोशी, गोंधळी, किंगरी वादक, शिवशाहीर कल्याण काळे, भारुडरत्न हमीद सय्यद, शाहीर अरुण आहेर आणि थाळी व समई नृत्य कलावंत जालिंदर जाधव  सहकारी सहभागी होणार आहेत. बी. आर. इव्हेंट्स प्रस्तुत महाराष्ट्राची लोककला या कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना, लेखन व दिग्दर्शन भगवान राऊत यांचे आहे.


 रविवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मा. संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी प्रकाश घोडके यांच्या अध्यक्षतेखाली  कवी संमेलन होणार आहे.या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील मान्यवर, नवोदित कवी तसेच शब्द गंधचे सभासद सहभागी होणार आहेत. याच कवी संमेलनामध्ये राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. 


दु. १२ वा. धनाजी गुरव (सांगली) यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक 'परिवर्तनात चळवळीची भूमिका' या विषयावर परिसंवाद होणार असून या परिसमदांमध्ये प्रा. के.ई. हरदास प्रा. डॉ. संदीप सांगळे आदी मान्यवर वक्ते या परिसंवादात सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. दुपारी २ वा. प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 'महिला सक्षमीकरणात मराठी साहित्याचे योगदान' या विषयावर परिसंवाद होणार असून या संवादात पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, प्रा. डॉ. शमीभा पाटील, प्रा. रेखा मेश्राम आदी सहभागी होणार आहेत. 


प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे व डॉ. संजय दवंगे हे या परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत. दुपारी ४ वाजता महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाचा समारोप व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक तथा लेखक डॉ. बी.जी. शेखर पाटील, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तथा लखनऊ विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते मिलिंद शिंदे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, अहमदनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे,सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, विरोधी पक्षनेते संपतराव बारस्कर, प्रबोधनकार भाऊ थोरात, डॉ. विजय भंडारी आदी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवियत्री शर्मिला गोसावी व कवी रज्जाक शेख, डॉ.रमेश वाघमारे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. या समारोप समारंभात सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.


२ दिवस होणाऱ्या या साहित्य संमेलनास अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिक व साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष आ. संग्राम भैय्या जगताप, संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष डॉ. अशोक कानडे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, प्रा. माणिकराव विधाते, प्रा. अरविंद शिंदे, अभिजीत खोसे, रेश्मा आठरे, राजेंद्र चोभे,  प्राचार्य जी. पी. ढाकणे, एन. पी. डफळ,  सुभाष सोनवणे, राजेंद्र पवार, बबनराव गिरी, तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड यांनी केले आहे.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.