न्याय्य हक्कासाठी १७ ऑक्टोबर मंगळवार रोजी निघणाऱ्या रिपाइं (ए) च्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा !.......दिपक कांबळे

 *न्याय्य हक्कासाठी १७ ऑक्टोबर मंगळवार रोजी निघणाऱ्या रिपाइं (ए) च्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा !.......दिपक कांबळे*



केज (प्रतिनिधी)

केज :- १७ ऑक्टोबर मंगळवार रोजी रिपाइं (ए) च्या वतीने गायरान धारक दिन दलित, भूमिहीन यांच्या न्याय व रास्त मागण्यासाठी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रिपाइंचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी केले आहे.


१७ ऑक्टोबर मंगळवार रोजी रिपाईं (ए) च्या तहसिल कार्यालयावर निघणाऱ्या भव्य अशा मोर्चाची तयारी झाली असून केज शहर व तालुक्यात  ना रामदासजी आठवले व पप्पू कागदे यांचे होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावले आहेत. कार्यकर्त्यांनी गावोगाव फिरून सभा व कॉर्नर मिटींग घेऊन तालुका पिंजून काढला आहे. बैठकांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मोर्चात जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. सन १९९० च्या गायरान जमिनी नियमाकुल करण्याच्या शासनाच्या निर्णयाला २००५ पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी. जि.प.शाळांचे करण्यात येणारे खाजगीकरण रद्द करण्यात यावे व विद्यार्थी पटसंख्येची अट रद्द करून ज्या-त्या शाळांवर शिक्षक नियुक्त करण्यात यावेत. केज शहरातील क्रांतीनगर, रमाई नगर येथील झोपडपट्टी वासियांना कचाला पावत्या देण्यात याव्यात. केज तालुक्यातील दलित बांधवांना स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात. राज्य शासनाकडून विविध कार्यालयात करण्यात येणारी कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी. या प्रमुख मागण्या आहेत.


या मोर्चात जिल्हा सरचिटणीस राजु जोगदंड, मराठवाडा उपाध्यक्ष मझर खान, जेष्ठ नेते प्रभाकर चांदणे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष दशरथ सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती आहे. तसेच मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळे (अंबाजोगाई), जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, माजी तालुकाध्यक्ष राहुल सरवदे, शहाराध्य भास्कर मस्के, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, रमेश निशीगंध, विकास आरकडे, युवा रिपाइंचे निलेश ढोबळे, प्रमोद दासुद यांची उपस्थिती राहणार आहे. केज आणि अंबाजोगाई तालुका व मतदार संघातील जनतेने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष दीपक यांनी केले आहे






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.