🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*नवरात्र जागर*
अंबिका, दुर्गा, सरस्वती ,चंडीका
नवचंडी ची रुपे तुझी पाहुया
नवरात्रीच्या या पवित्र मंगल रात्री
ज्ञानदिप घरोघरी आपण लावुया
पहिली रात्र अन्नदानाची करुया
भुकेलेल्या कन्येला घास भरवुया
दुसरी रात्र वस्त्रदानाची करुया
अंग झाकण्या तीला कपडे देऊया
तिसरी रात्र ज्ञानदानाची करुया
शिकण्यासाठी पुस्तक देऊया
चौथी रात्र आर्थिक दान करुया
एकिची तरी शैक्षणिक फी भरुया
पाचवी रात्र सहकार्याची करुया
गरजवंत हाताला काम देऊया
सहावी रात्र जबाबदारी घेऊया
अनाथांची माय आपण बनुया
सातवी रात्र ज्ञानाला देऊया
शैक्षणिक साहित्य तिला घेऊया
आठवी रात्र जनजागृतीची करुया
तिच्या जीवनाला आधार देऊया
नववी रात्र ही संकल्पाची करुया
सामाजिक कार्याचा वसा घेऊया
दिन दुबळ्या मुली ,भगिणींना
आपल्या सहकार्याचा हात देऊया
सुप्रिया लक्ष्मण इंगळे
जि प प्राथ शाळा गंगानगर
नेवासा
👩👮♀️👩⚕️👷♀️👩🍳👩💻👩✈️


stay connected