वाळुंज कथित ॲट्रॉसिटी प्रकरणातील अर्जदार महिलेला फूस लावणाऱ्या मास्टरमाईंडवर कारवाई करा

 वाळुंज कथित ॲट्रॉसिटी प्रकरणातील अर्जदार महिलेला फूस लावणाऱ्या मास्टरमाईंडवर कारवाई करा

****************************

डॉ.बाबासाहेब आंबेडकर फोरम यांची मागणी

*****************************




*****************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील कथित ॲट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये आ. सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांना कट कारस्थान करून राजकीय सुटाने नाव घेत आदिवासी समाजात बदनामी व्हावी या हेतुने जाणीवपूर्वक बदनामी केली असून आ.सुरेश धस हे भटक्या विमुक्त जाती आदिवासी सर्व वंचित घटकांना न्याय देणारे नेते असून त्यांना विनाकारण या प्रकरणात गोवण्यात येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून अर्जदार आदिवासी महिलेला फूस लावून गोरगरीब जनतेला पुढे करणाऱ्या यामागील मास्टर माईंड शोधावा व बदनामी केल्याबाबत चौकशी करून कारवाई करावी अशी निवेदनाद्वारे मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांसह तहसीलदार आष्टी,आष्टी पोलीस स्टेशन यांना आ.सुरेश धस यांच्या कुटुंबावरील खोटे गुन्हे मागे घ्या या घोषणा देत मोर्चा काढत निवेदन दिले.

या निवेदनाद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर फोरमच्या वतीने अशी मागणी केली आहे की, आमदार सुरेश धस व त्यांच्या कुटुंबातील या घटनेची दुरान्वये संबंध नसताना पैसे उकळण्यासाठी काही राजकीय पुढार्‍यांनी दलित आदिवासी समाजाच्या कुटुंबाला हाताशी धरून हा डाव रचला असून आदिवासी समाजात बदनामी व्हावी या हेतूने सदरील बदनामीचा प्रकार सुरू आहे याचा आम्ही संपूर्ण तालुक्यातील सर्व धर्मीय जाहीर निषेध करत आहोत सदर प्रकरणाची सकल चौकशी करून प्रकरणांमध्ये खोटे षडयंत्र रचणारा मास्टरमाईंड व त्या आदिवासी महिलेचे फोन तपशील काढून संबंधिताविरुद्ध तात्काळ कारवाई करावी व धस कुटुंबांची बदनामी थांबवावी नाहीतर न थांबल्यास तीव्र पद्धतीने आंदोलन केले जाईल असा इशारा या निवेदनातून दिला आहे.

यावेळी तालुक्यातील दीनदलित, आदिवासी,भटक्या, विमुक्त वंचित सर्व घटकांतील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.