बीड जिल्हा अपघाताने हादरला..दोन अपघातात ९ जणांचा मृत्यू

 बीड जिल्हा अपघाताने हादरला..दोन अपघातात ९ जणांचा मृत्यू

*******************

मुंबईहून बीडच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा आष्टा ह.ना.जवळ भीषण अपघात;५ प्रवाशांचा मृत्यू

********************

नगर-बीड महामार्गावर दौलावडगाव रुग्णवाहिका व ट्रकचा अपघातात डॉक्टर, रुग्णवाहिका चालकासह एकूण 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू..

******************************



आष्टी (प्रतिनिधी) 

मुंबईहून बीडला निघालेल्या सागर ट्रॅव्हल्सचा आष्टी शहरापासून बारा कि.मी.अंतरावर असलेल्या आष्टा ह.ना.गांधनवाडी फाट्याजवळ ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात ५ ठार झाले असून,२३ जण जखमी झाले असून तर दुसरा अपघात बीड-कल्याण महार्गावर रूग्णवाहिकेत रूग्णांना धामणगांववरून नगर येथे उपचारासाठी घेऊन जाण्या-या रूग्ण वाहिकेला अपघातात डाॅक्टरासहित ४ जण ठार झाल्याने दोन वेगवेगळ्या अपघातात ९ ठार झाल्याने बीड जिल्हा हादरला आहे.

       मुंबईहून बीड कडे येणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टा ह.ना गांधनवाडी फाटा जवळ  हा अपघात झाला असून यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ४५ ते ५० प्रवासी यातून प्रवास करत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. पहाटेच्या सुमारास सागर ट्रॅव्हल्स (क्र.एन. एल.०१ बी.२४९९ ) मुंबईहून बीडच्या दिशेने येत असताना आष्टा हरिनारायण गांधनवाडी येथे वळण घेताना हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल १०० ते १५० फूट घसरत गेली. 




यामध्ये १) धोंडीबा यशवंत शिंदे वय ३६ रा. भिल्लारवाडी पो. जाटनांदूर ता. शिरूर जि. बीड, २) देविदास दत्तू पेचे  रा. सौताडा ता. पाटोदा जि.बीड ३) अशोक महादेव भोंडवे पिट्टी नायगाव ता.पाटोदा जि. बीड ४)महमद आसिफ दोस्त महमद खान रा.कुर्ला मुंबई पश्चिम ५)रवी यादव गोंडवे (वय २८) 

मोतीनगर डीग्रस ता.पुसद जि.यवतमाळ या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या सह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल केले आहे. आष्टी आणि जामखेड,अहमदनगर येथे जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.गंभीर प्रवाशांना अहमदनर येथे हलविण्यात आले आहे.

तर दुसऱ्या घटनेत 

आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (क्र.एम.एच.२१ एक्स ८६००) हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात होता.रात्री ११ वाजेदरम्यान व्यंकटेश कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने (क्र.एम.एच.१६ क्यू.९५०७) जोरदार धडक दिली.यामध्ये सांगवीपाटण येथील डॉ.राजेश झिंजुर्के (वय ३८) आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडे (रा.धामणगाव),मनोज पांगु तिरपुडे,पप्पु पांगु तिरखुंडे दोन्ही राहणार जाटदेवळा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

एका जखमीवर उपचार सुरु आहेत.या रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते.

      

**************

आ.सुरेश धसांची मदतीसाठी घटनास्थळी धाव...

******************

दरम्यान अपघाताची माहिती सकाळी ६ वाजेच्या दरम्यान एका कार्यकर्त्याने फोनवर दिल्यानंतर आ.सुरेश धस यांनी अपघात क्षेत्रातील बाजूच्या असलेल्या आष्टा,गांधनवाडी,चिंचपुर या सह परिसरातील इतर कार्यकर्त्यांना  देखील तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी जाण्याचे आवाहन केले.त्यानंतर त्यांनी तहसीलदार, पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग यांना घटनेची माहिती देत घटनास्थळी जाण्याची विनंती केली.या अपघात ग्रस्त नागरिकांची आष्टी ग्रामीण रुग्णालयात जाऊन आ.धस यांनी विचारपूस केली.त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य आणि समयसूचकता किती महत्त्वाची असते याचे उत्तम उदाहरण आपल्या कार्यशैलीतून आ.धस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.