जनता महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत सुयश
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजी नगर (औरंगाबाद ) यांच्या संयुक्त विद्यमाने, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग येथे झालेल्या अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये जनता कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा तालुका आष्टी जिल्हा बीड येथील महाविद्यालयाच्या कुस्तीपटू खेळाडू विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पुजारी गोल्ड मेडल 59 किलो , संजना दिसले गोल्ड मेडल 62 किलो, वेदिका सासणे गोल्ड मेडल 76 किलो व चैताली घुले सिल्वर मेडल 57 किलो वजनी गटात यांनी प्रचंड यश संपादन करून संस्थेचे व महाविद्यालयाचे नाव उज्वल केले या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष श्री अब्दुल भाई सय्यद तसेच संस्थेचे सचिव श्री विजयकुमार बांदल अण्णा यांच्यासह व्यवस्थापक विशाल बांदल साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एकनाथ खांदवे सर , प्राध्यापक विक्रम बांदल सर आंतरराष्ट्रीय पंच किरण मोरे सर फिजिकल डायरेक्टर प्राध्यापक गुरसाळे सर जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री युनूस सय्यद सर उप प्राचार्य श्री बाबासाहेब कर्डिले सर वरिष्ठ महाविद्यालयाचेओ एस प्राध्यापक शंकर गाडे सर , अरुण गुंड सर सह आदींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.



stay connected