अतिवृष्टीचे रक्कम उर्वरित शेतकऱ्यांचा खात्यात केव्हा जमा होणार ? तलाठी कागदेची चौकशी करून तात्काळ बदली करा- गणेश पांडुळे.

 अतिवृष्टीचे रक्कम उर्वरित शेतकऱ्यांचा खात्यात केव्हा जमा होणार ? तलाठी कागदेची चौकशी करून तात्काळ बदली करा- गणेश पांडुळे.



कडा प्रतिनिधी..सन २०२२-२३मध्ये महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी जाहीर केली तत्काळ शेतकऱ्यांचा खात्यात रक्कम जमा करा असे आदेश देऊन सुध्दा आष्टी तालुक्यातील जळगाव सज्जातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित असुन शासनाच्या आदेशाला पायमल्ली तुडवण्याचे काम जळगाव सज्यातील तलाठी महाशय जगदीश कागदे करीत असल्याचा आरोप शेरी बु!! सह अनेक गावातील ग्रामस्थ करीत आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार जळगाव येथे सज्जा आहे परंतु हे तलाठी महाशयांनी आपल्या सोयीनुसार सज्याचे कार्यालय आष्टी शहरात सुरू केले आहे त्यामुळे विशेष म्हणजे जळगाव सज्जा असतांना जळगाव, वटनवाडी, शेरी बु, मांडवा सह अनेक शेतकऱ्यांना पदरमोड करून तालुक्याच्या ठिकाणी तलाठी कार्यालयात कामानिमित्त यावे लागते. त्यावेळी कधी कधी कार्यालय बंद


असल्याने मनस्ताप होतांना दिसत आहे आणि कार्यालय चालू असताना सातबारा, फेरफार पंजी, उत्पन्न दाखला, दुरुस्ती प्रमाणपत्रा साठी शेतकऱ्यांना अर्थपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील कामे, सातबारा इतर कागदपत्रे मिळत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेतकयांसोबत सतत उर्मटपणा भाषेचा वापर करून अपमानित करतात. तुम्ही कुठं जा, तहसीलदार यांच्याकडे जा मला काहीही फरक पडत नाही. या भाषेचा वापर करून शेतकऱ्यांना अपमानित करीत आहेत. जे शेतकरी अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांचा खात्यात तत्काळ रक्कम जमा करा व कामचुकार व अंशकालीन तलाठी जगदीश कागदे ह्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून तत्काळ बदली करण्यात यावी व जळगाव सज्जातील अतिवृष्टीच्या रक्कमे पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी  ..गणेश पांडुळे यांनी केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.