हाळम फेस्टिव्हल यावर्षी साधेपणाने साजरा होणार -माधव मुंडे

 *हाळम फेस्टिव्हल यावर्षी साधेपणाने साजरा होणार -माधव मुंडे*



*हाळम फेस्टिव्हलच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रल्हाद मुंडे तर सचिवपदी विष्णू दहिफळे यांची निवड*



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  हाळम फेस्टिव्हलच्या माध्यमातून सामाजिक , अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक क्षेत्रात आपल्या कार्यक्रमाने आगळा वेगळा ठस्सा उमटवणारा हाळम फेस्टिव्हलची यावर्षीची हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गा महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी प्रल्हाद मुंडे तर सचिवपदी विष्णू दहिफळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. हाळम फेस्टिवल यावर्षी साधेपणाने साजरा होणार असल्याची माहिती संस्थापक तथा युवा नेते माधव मुंडे यांनी दिली.

          रविवार दि.१५  ते २४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान नवरात्र उत्सव निमित्त हाळम फेस्टिवल यावर्षी दुष्काळी पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. रविवारी देवीची घटस्थापना व इतर धार्मिक कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी परळी वैजनाथ तालुक्यातील हाळम येथे देवीची घटस्थापना करून नऊ दिवस विविध स्वरूपाचे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. परंतु यावर्षी  पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधव संकटात आहे. या पार्श्वभूमीवर हाळम फेस्टिवल सर्व कार्यक्रम रद्द करून साधेपणा साजरा होणार आहे. हाळम येथे देवीची घटस्थापना व नऊ दिवस विधिवत पूजा अर्चा चालणार आहेत.

    गेल्या 18 वर्षापासून ग्रामीण भागात अखंडपणे साजरा होणारा लोकोपयोगी महोत्सव म्हणजे परळी तालुक्यातील हाळम फेस्टिवल आहे. आदिशक्ती आदिमायेचा उत्सव हळम मध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आध्यात्मिक आरोग्य विषयक उपक्रम राबवून हा महोत्सव लोकोपयोगी केला आहे. हाळम फेस्टिव्हलची यावर्षीची हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गाउत्सव साधेपनाने साजरा होणार आहे.  हाळम येथे हाळम फेस्टिव्हलचे संस्थापक तथा युवा नेते माधव मुंडे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी  हाळम फेस्टिव्हलची यावर्षीची हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गाउत्सव साधेपनाने साजरा करण्याचा निर्णय बैठकीत ठरविण्यात आले. हाळम फेस्टिव्हल तब्बल 18 वर्षांपासून ग्रामीण भागातील नागरिकांना कार्यक्रमांची रेलचेल देत आहे. परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे हाळम फेस्टिवल यावर्षी साधेपणाने साजरा होणार असल्याची माहिती संस्थापक युवा नेते माधव मुंडे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात दिली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.