पत्रकार दिगंबर बोडखे यांना पत्नीशोक

 पत्रकार दिगंबर बोडखे यांना पत्नीशोक



--------------------------------------

आष्टी/प्रतिनिधी

कडा दै.झुंजार नेताचे जेष्ठ पत्रकार दिगंबर बोडखे सर यांच्या सौभाग्यवती रत्नमाला दिगंबर बोडखे यांचे मंगळवार दि. १० रोजी दुपारी अहमदनगर येथील दवाखान्यात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय  ४७ होते. दिवंगत सौभाग्यवती रत्नमाला बोडखे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, विवाहित मुलगी, जावई, आईवडील, दोन मेहुणे असा मोठा परिवार आहे. कडा येथील अमरधाम येथे मंगळवारी रात्री ९ वा . त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोडखे कुटूंबियांवर कोसळलेल्या दुःखांत तेजवार्ता परिवार सहभागी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.