पाठपुराव्याला यश आले.. कुकडी प्रकल्पाचे पाणी सीना धरणात सोडणे सुरू झाले.
आ. सुरेश धस यांनी ना.चंद्रकांत दादा पाटील साहेब मंत्री, तथा कालवा सल्लागार समिती अध्यक्ष यांच्याकडे आष्टी तालुक्यातील पावसाची आकडेवारी, मध्यम व लघु प्रकल्पातील अपुरा पाणीसाठा लक्षात घेता, दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झालेली असल्या मुळे कुकडी प्रकल्पातून अति प्रवाहित होणारे १.२ टी. एम.सी.पाणी सीना मेहकरी उपसा सिंचन योजने अंतर्गत.. असलेले हक्काचे पाणी सीना प्रकल्पात सोडण्यात यावे आणि सीना धरणातून पंपाच्या सहाय्याने ते मेहकरी धरणात सोडण्यात यावे आणि कालवा समितीची तात्काळ बैठक बोलवावी अशी विनंती काल दि.२९सप्टेंबर रोजी पत्राद्वारे केली होती,तसेच आज मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून ..याबाबत विनंती केल्यानंतर .. दादांनी तात्काळ संबंधित विभागाला सुचना दिल्यामुळे काल दि.३० रोजी.. रात्री पासून कुकडी प्रकल्पातून सीना प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिले असल्यामुळे ..पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती श्री.मुठे साहेब (विशेष कार्यकारी अधिकारी ) यांनी आ. सुरेश धस यांना दिली आहे...
यामुळे मेहेकरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला जातो आहे



stay connected