जितवचन......!

 *जितवचन......!*



          *ज्या दलदलीत लोक तुम्हाला मागे ओढण्यासाठी टपलेले असतात, त्यांना तुमच्या कार्य कुशलतेचे मूल्य नसते,तुमची तिथे योग्य किंमत होत नाही, तिथे वाहवा करून घेण्यासाठी मुळीच प्रयत्न करू नका.तिथे फक्त तुमचे तेजस्वी,मानव उध्दाराचे आणि मानवी कल्याणाचे विचार सोडा,तुमचे अनुयायी बनवा  आणि एकट्याचा दुसरा मार्ग पकडा जो तुम्हाला योग्य सुरक्षित आणि मुक्कामाला ध्येयापर्यंत पोहचवेल तो अदृश्य ठेवा आणि योग्य वेळ आणि काळ पाहून त्यावर मार्गक्रमण करा.यश झक मारत मागे येईल. जीवनात नेहमी दोन मार्ग तयार ठेवा एकाला पर्याय दुसरा. हरलात तर मार्ग बदला जिंकलात तर त्यावरच चला.कलियुगात तुमची बंद पडलेली चूल कोणा आश्चर्याने,मंत्राने,साधनेने किंवा एखाद्याच्या आशीर्वादाने पेटणार नाही इथे तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील.स्वतःवर विश्वास ठेवा आत्मनिर्भर राहुन सातत्यपूर्ण अथक प्रयत्न करा. मान-अपमान काहीतरी अचीव्ह केल्यावर करा. उगाचच लोकं काय म्हणतील याची भीती बाळगू नका.स्वतःला स्वतःचा ताबा द्या तुमचा मालक आणि चालक खुद तुम्हीच बना म्हणजे तुम्ही कुणाचेही गुलाम बनू नका. राज्या सारखं स्वतंत्र आयुष्य जगा.आणि हो हे कायम लक्षात ठेवा तुम्हाला  'राजा बनायची हौस असेल तर गुलामासारखे कष्ट करा एकदिवस तुम्ही नक्कीच राजा असाल' हेच माझं जितवचन आहे..... 

लेखन - मा.सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर ९९२२५४१०३०*





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.