मतदारसंघातील पर्यटन विकास योजनेअंतर्गत 6 कोटी 55 लक्ष रुपयाच्या विकास कामांची स्थगिती उठवली - आ.बाळासाहेब आजबे यांची माहिती

मतदारसंघातील पर्यटन विकास योजनेअंतर्गत 6 कोटी 55 लक्ष रुपयाच्या विकास कामांची स्थगिती उठवली - आ.बाळासाहेब आजबे यांची माहिती 



आष्टी प्रतिनिधी 

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील तीर्थक्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटनमंत्री यांच्याकडे आपण निधीची मागणी केली होती माझ्या पत्रावरील मागणीनुसार राज्य शासनाच्या वतीने मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकासासाठी 6 कोटी 55 लक्ष रुपयांच्या विकास कामावरील स्थगिती उठवून निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली .

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यावेळी पुढे बोलताना म्हणाले की मतदार संघातील  लोणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील श्री क्षेत्र खंडोबाची बाबा मंदिर देवस्थान परिसर विकसित करणे 4 कोटी 20लक्ष रुपये 2) श्री क्षेत्र अश्वलिंग देवस्थान पिंपळवंडी ता पाटोदा येथे सभा मंडप बांधणे  50 लक्ष रुपये 3) श्री क्षेत्र अश्वलिंग देवस्थान पिंपळवंडी तालुका पाटोदा येथे अंतर्गत रस्ते बांधणे 35 लक्ष रुपये 4)श्री क्षेत्र तारकेश्वर गड तालुका आष्टी येथे भक्तनिवास बांधणे 50 लक्ष रुपये 5)श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड सावरगाव तालुका आष्टी येथे वाहनतळ व अंतर्गत रस्ते बांधकाम करणे 50 लक्ष रुपये 6) संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासंगवी तालुका पाटोदा येथे सभामंडळ बांधकाम 50 लक्ष रुपये अशा एकूण सहा कोटी 55 लक्ष रुपये किमतीच्या विकास कामासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आपण वेळोवेळी पाठपुरावा करून या कामावरील स्थगिती उठवण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार आज अखेर या कामावरील स्थगिती उठवून निधी मंजूर करण्यात आला आहे त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मा.नामदार अजितदादा पवार साहेब मा. नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मा. नामदार धनंजय मुंडे साहेब मा. नामदार गिरीशजी महाजन साहेब या सर्वांचे आष्टी पाटोदा शिरूर मतदार  संघातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानतो यापुढेही पर्यटन विकास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मतदार संघासाठी खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी शेवटी सांगितले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.