गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करून गर्भपात करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करा!

 गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करून गर्भपात करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करा!

_____________________________________

 खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी पती-पत्नीचे आमरण उपोषण



-----------------------------------------------------------

शेरी / राजू म्हस्के:- आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द येथील शिवाजी बबन बनसोडे यांना व त्यांच्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करून गर्भपात करणारे आरोपी यांच्यावर १ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला असून त्यामधील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी मोकाट फिरत असून त्यांच्यापासून आमच्या जिवितास धोका आहे तसेच आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून ते तात्काळ मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी शिवाजी बनसोडे हे आपल्या पत्नी यांचे आष्टी तहसील कार्यालयासमोर कालपासून आमरण उपोषण सुरू केले आहे 



मा.तहसीलदार यांना शिवाजी बनसोडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शिवाजी बनसोडे हे कानडी खुर्द ता आष्टी येथील रहिवासी असून  त्यानी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,माझ्या  भावकीतील आठ लोकांनी २ ऑगस्ट २०२३ रोजी डोळ्यात मिरची पावडर टाकून मला मारहाण करण्यास सुरुवात केली मी ओरडलो त्यावेळी जवळच असलेली पत्नी मला सोडवण्यासाठी आली व त्यांनी माझ्या गरोदर असलेल्या पत्नीस लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी माझी पत्नी सांगत होती मी गरोदर आहे मला मारू नका असे म्हणतात पोटात जोरात लाथा बुक्क्याने मारण्यास सुरुवात केली त्यामुळे तिच्या पोटातील गर्भास मार लागल्याने भृणहत्या झाली आहे  या निष्पाप भ्रूणहत्येस आठ आरोपी जबाबदार आहेत तसेच मला नाकावर गंभीर जखम करून भरपूर मारहाण केली आहे. माझ्या दिलेल्या फिर्यादीवरून कलम 325, 324 प्रमाणे ६ ऑगस्ट 2023 रोजी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून यामधील दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत परंतु उर्वरित आरोपी मोकाट आहेत त्यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे आणि तसेच आमच्यावर खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी पती-पत्नीचे कालपासून आमरण उपोषण सुरू आहे.या विषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना बनसोडे म्हणाले आम्ही पतिपत्नी कालपासून तहसील कार्यालयासमोर बसलो असून  अद्याप पर्यत तहसीलदार व पोलिस प्रशासन या पैकी कोणीही आमची दखल घेतली नाही








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.