BJP ने Gopichand Padalkar यांना आवरावे अन्यथा जशास तसे उत्तर देऊ - शिवाजी राऊत यांचा इशारा

 भाजपाने गोपीचंद पडळकर यांना आवरावे अन्यथा जशास तसे उत्तर देऊ - शिवाजी राऊत यांचा इशारा 


आष्टी प्रतिनिधी

 भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विषयी गरळ ओकण्याचे काम केले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की या आमदार  पडळकरला आवरा अन्यथा आम्ही सुद्धा जशास तसे उत्तर देण्यास तयार आहोत असा इशारा बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे उपाध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत यांनी आष्टी येथे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी बोलताना इशारा दिला 

      पुढे बोलताना डॉक्टर शिवाजी राऊत म्हणाले की धनगर समाज हा सुसंस्कृत समाज असून आज पर्यंत कोणत्याही समाजातील व्यक्तीने अशा प्रकारचे गरळ ओळखलेली नाही आमदार गोपीचंद पडळकर यांना केवळ पवार घराण्यावर बोलण्यासाठी आमदारकी बहाल करण्यात आले आहे काय असा प्रश्न निर्माण होतो आमदार गोपीचंद पडळकर यांनी लायकीतच राहावे कारण ते सतत आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे विषयी खालच्या पातळीवर बोलत असतात त्यांची ही टीका अत्यंत खालच्या स्तरावर असल्यामुळे आमच्या धनगर समाजातील कोणाचेही  त्याला समर्थन मिळणार नाही आम्ही सर्वजण या वक्तव्याचा निषेध करत आहोत, सध्या धनगर आरक्षण प्रश्नाने महाराष्ट्र राज्यभर सरकारचे लक्ष वेधले असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी या विषयावरचे लक्ष विचलित व्हावे यासाठी तर हे वक्तव्य केले नाही ना अशी शंका येते त्यांना धनगर समाजाचे एवढी काळजी असेल तर त्यांनी चोंडी येथे उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना भेट देखील देण्यास त्यांना वेळ नाही आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना आवरले नाही तर आम्ही देखील त्यांना जशास तसे उत्तर देऊ असेही त्यांनी शेवटी सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते एडवोकेट पंढरीनाथ पारखे यांनीही निषेध व्यक्त करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या निषेदाच्या घोषणा दिल्या यावेळी जि प सदस्य सतीश आबा शिंदे ज्येष्ठ नेते काकासाहेब शिंदे महेश भैया आजबे सुधीर जगताप अशोक पोकळे नागिन शेख डॉक्टर संतोष कदम दीपक पिसाळ पंडित पोकळे अक्षय हडपवत राजेंद्र दरांगे भाऊसाहेब अस्वर  देवेश शेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.