सरस्वती विद्यालयात विज्ञान कार्यशाळेचे आयोजन

सरस्वती विद्यालयात विज्ञान कार्यशाळेचे आयोजन





सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सिंधूनगर ,निगडी पुणे - ४४(विज्ञान बालमंडळ,इयत्ता ५ वी ते ७ वी )तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, देहू शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज, सोमवार दिनांक ११/९/२०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.कार्य शाळेत समाजातील अंधश्रद्धा आणि आपण या विषयावर माननीय भारत जी विठ्ठलदास सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सरांनी विविध प्रयोगातून प्रत्यक्ष मुलांना प्रात्यक्षिके दाखवून अंधश्रद्धा निर्मूलन कसे करता येईल याबाबत माहिती दिली.

    संस्थेचे संस्थापक मा. दाभाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.या कार्यशाळेस विद्यालयाच्या प्राचार्या मा .साधना दातीर मॅडम,उप प्राचार्य श्री.विजय बच्चे सर,पर्यवेक्षक श्री.प्रदीप काळोखे सर,पर्यवेक्षिका मा .सुरेखा वाळूंज मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले.तसेच श्री.राहुल वांगेकर सर,सौ.सविता पाटील मॅडम,सौ. प्रतिमा काळे मॅडम,सौ.सुकन्या जाधव मॅडम या विज्ञान शिक्षकांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.