क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अहमदनगर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थिनी चा *क्रेडिट ॲक्सेस इंडिया फाउंडेशन आणि क्रेडिट ऍक्सेस ग्रामिण लि.* या लघुवित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून दि. 21 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे *मा.डेप्युटी कलेक्टर सौ.पल्लवी निर्मळ मॅडम* यांच्या उपस्थितीत जिल्यातील 6 विद्यार्थीनी ना प्रत्येकी रोख रक्कम आणि प्रशस्ती पात्र देऊन गौरव करण्यात आला अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या शेतकरी वर्गातील मुलीचे पुढचे शिक्षण थांबू नये या साठी एक मानवतावादी सेवाभाव म्हणून एक पाऊल पुढे टाकून क्रेडिट ॲक्सेस या संस्थेद्वारे राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण विद्या प्रतिभा या योजनेद्वारे
1-प्रतीक्षा वाळके -श्रीगोंदा
2-अस्मिता खुळे -राहुरी
3-भारती लोखंडे -आष्टी
4-पायल कदम -राहता
5-साक्षी ठोके -श्रीरामपूर
6-प्रणाली शेंडगे -नेवासा
यांना प्रत्येकी 15000 रोख आणि एक प्रशस्ती पत्र आणि त्यांच्या पालकांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावून त्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला त्यावेळी उपस्थित collector मॅडम यांनी विद्यार्थी आणि पालकांना समोरील दिशा आणि येणारी आव्हाने कशी दूर करायची आणि समोर कशे यश प्राप्त करता येईल यावर सखोल आसे मार्गदर्शन देखील केले. तसेच क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड या लघुवित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कदम उंचाडकर यांनी देखील पालकांना आणि विद्यार्थीनी मार्गदर्शन करून पुढील यशासाठी सर्व विद्यार्थिनींना शुभेच्या देखील दिल्या,यावेळी संस्थेमार्फत उपस्थित क्षेत्र व्यवस्थापक रवींद्र रकटाटे आणि शाखा व्यवस्थापक आदिनाथ जाधव आणि कर्मचारी प्रशांत नेमाने, हृषीकेश काळे उपस्थित होते
stay connected