धम्म परिषदेच्या पुर्व नियोजनानिमित्त कडा येथे बैठक संपन्न

 *धम्म परिषदेच्या पुर्व नियोजनानिमित्त कडा येथे बैठक संपन्न..!*

-------------------------------------

*१५ हजार धम्म बांधवांच्या उपस्थित ही धम्म परिषद आयोजित करणार - तालुकाध्यक्ष सुभाष भादवे*

------------------------------



आष्टी/प्रतिनिधी

आष्टी तालुक्यात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या हेतूने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज दिनांक २३ रोजी कडा येथील बुद्धविहारात दुपारी एक वाजता ही बैठक संपन्न झाली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा ही भारतीय बौद्धांची मातृसंस्था म्हणून ओळखली जाते.या संस्थे अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प पुर्ण करण्याच्या हेतूने आष्टी तालुकाभर ही संस्था कार्य करते.

त्याच धम्माचा प्रचार प्रसाराच्या अनुषंगाने आज कड्यात ही बैठक संपन्न झाली.

यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

तसेच या धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला आष्टी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी राजकिय गट तट बाजूला ठेवून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येणार व ही धम्म परिषद विराट होणार अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे आष्टी तालुकाध्यक्ष सुभाष भादवे सर यांनी दिली आहे.

यावेळी,बीड जिल्हाध्यक्ष महालिंग दादा निकाळजे,वामणराव निकाळजे, सुनिल शिंदे सर, सखाराम ससाणे,भिमराव आहेर, संतोष साळवे, राहुल जाधव, संतोष ससाणे, आकाश कांबळे, बाळासाहेब शिंदे, पत्रकार संदिप जाधव,रत्नकांत निकाळजे, संतोष गजघाट,प्रा ओव्हळ सर, अशोक निकाळजे, सुनिल खंडागळे,आश्राजी खंडागळे, बाळासाहेब राजगूरू,भगवान राजगुरू,ग्रा.प.सदस्य राजु साळवे,बंटी घोडके, निलेश कांबळे, रामु घोडके, सुनिल घोडके, सुमित जाधव, सुनिल साळवे,विजय काळे, सिताराम घोडेस्वार,सतिष राजगुरू,राजु काळे,कैलास चंदनशिव,दशरथ शिंदे,ॲड.जितेन्द्र खंडागळे, सुवर्त गव्हाळे , अशोक शिंदे (लोणी) बबलु आखाडे, महादेव काळे, रमेश काळपुंड, संदिप निकाळजे,हाजीपूर किशोर निकाळजे, कैलास जोगदंड, युवराज निकाळजे, बापूराव लोंढे,आजिनाथ ओव्हाळ,अशोक निकाळजे,कुणाल निकाळजे, सुनिल निकाळजे, संतोष गजघाट, जालिंदर शिंदे आदी सर्व धम्म बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष भादवे सर होते.

सुत्रसंचलन आकाश कांबळे यांनी केले तर आभार संतोष ससाणे यांनी मानले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.