*राजस्थानच्या राजधानीत अहमदनगरकरांचा जय महाराष्ट्र !*
*खेल कराटे लीग मध्ये नगरच्या खेळाडूंचा डंका !*
महेक पठाण , अरफा शेख , इब्राहिम शेख यांची सुवर्ण कामगिरी !
नगर / प्रतिनिधी
नगर : १३ / एस.एम.एस स्टेडियम जयपूर राजस्थान येथे दि. ८ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर ला झालेल्या खेल कराटे लीगच्या सीझन २ मध्ये महाराष्ट्र संघाने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे .
विशेष म्हणजे महाराष्ट्र संघात या वर्षी अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील युथ कराटे फेडरेशन या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या ८ खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता.
यात सर्व खेळाडुंनी उल्लेखनीय कामगिरी करून अहमदनगर चे नाव उंचावले असून विविध पदकांची कमाई केली आहे .
यामध्ये १४ वर्षाखालील महिला गटामध्ये महेक पठाण , आरफा शेख , आलिया सय्यद , तर १४ वर्ष खालील पुरुष गटामध्ये आशाज शेख , अहमद शेख , इब्राहिम शेख , अरकम सय्यद , आणि १७ वर्षा खालील वयोगटात यहया सय्यद हे नगर शहरातील खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत होते.
यामध्ये नगर शहरातील महेक पठाण , अरफा शेख , इब्राहिम शेख यांनी सुवर्ण कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले , तर याहया सय्यद यास रजत पदक , आणि आलिया सय्यद , अशाज शेख , अहमद शेख , अरकम सय्यद यांनी कांस्य पदकांची कमाई केली आहे .
नगर शहरातील सर्वच विजेत्या खेळाडूंना युथ कराटे फेडरेशनच्या अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटणारे प्रशिक्षक साहिल सय्यद आणि सबील सय्यद नेहमीच प्रयत्नशील असतात. आज त्यांच्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांनी यश मिळवून दिले आहे .
खेल कराटे लीग या स्पर्धेत भारतातील २९ राज्यातील सुमारे ३००० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि आपआपल्या राज्य संघाचे नेतृत्व करून बाजी मारली. खेल कराटे लीग मधील विजेत्या खेळाडूंवर बक्षिसे आणि कौतुकांचा मोठा वर्षाव दिसुन आला . विजेत्या खेळाडूंना , प्रमाणपत्र , पदक , आणि बक्षीस स्वरूपात रोख रक्कम देखील प्रदान करण्यात आली.
खेल कराटे लीग या स्पर्धेचे विविध प्रसार माध्यमांवर थेट प्रक्षेपण देखील केले जाते . या वर्षीही विविध प्रसार माध्यमांवर तसेच विविध ओटीटी माध्यमांमध्ये या लीग चे प्रक्षेपण ८ ते ११ सप्टेंबर ला करण्यात आले होते.
सर्वच विजेत्या खेळाडूंनी स्पर्धा संपल्यानंतर जयपूर येथील स्टेडियम मध्ये "जय महाराष्ट्र" च्या घोषणा देत आनंद उत्सव साजरा केला.
खेल कराटे लीग मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल अहमदनगर शहरातील या विद्यार्थी खेळाडूंचे सामाजिक राजकिय सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.




stay connected