बैलपोळा

 *बैलपोळा*




शेतकऱ्यांचा  कोण आहे  लेकरु

बैल त्याचे नाव  तो होतकरु


रात्रदिंवस शेतात तो राबतो

तेव्हा शेतकरी धनधान्य पिकवतो


नांगरणी करतांना मानेवर तान

ढेकळ फोडतांना ठेवतो तो जाण 


ढवळ्या च्या   पाठिवर हात

प्रेमाची तो वर्षभर देतो साथ


पोळा सण येताच त्याला नटवा

फुगे झुलाने त्याला हो सजवा



पुरणपोळी चा नैवेद्य  खाऊ घालु

सन्मानाने त्याची आरती ओवाळू


घर जेव्हा धनधान्याने भरते 

 मनात आनंदाचे तरंग उठते


शेतकरी साठी  फक्त प्राणी नाही

  मुलाच्या ठिकाणी त्याला पाही


बैलपोळा साजरा करुया छान

वर्षभराचा कष्टाची ठेवुया जान



कवयीत्री

सुप्रिया लक्ष्मण इंगळे

जि प प्राथ शाळा गंगानगर नेवासा








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.