धानोरा स्टॅण्डवर झालेल्या अपघातातीत जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

धानोरा स्टॅण्डवर झालेल्या अपघातातीत जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू



धानोरा (प्रतिनिधी ) : - धानोरा येथील बस स्टॉपजवळील रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीला आठ दिवसांपूर्वी दुचाकीस्वाराने धडक दिली होती. धडकेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा अहमदनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील धानोरा येथील बाबासाहेब रामदास वाघमारे ( वय ४४) २१ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता गावातील बस स्टॉपजवळ रस्त्याच्या कडेला थांबले होते. दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू होते. त्यानंतर, त्यांना गुरुवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आई , वडील , एक भाऊ असा परिवार आहे . शुक्रवारी सकाळी 11 वाजता धानोरा येथील अमरधाम येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.