भगवानराव शिनगीरे आणि अरुण पडोळे यांचा सीईओ यांच्या हस्ते गौरव : उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिसऱ्यांदा सन्मान
**********************
**********************
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील वटणवाडी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भगवानराव शिनगीरे व सचिव अरुणजी पडोळे यांचा अविनाशजी पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी बीड, ठोंबरे प्रशासकीय अधिकारी बीड, अशोकरावजी कदम औसाचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), समृद्ध जाधव जिल्हा उपनिबंधक बीड, भोसले जिल्हा लेखाधिकारी बीड या मान्यवरांच्या हस्ते 25 सप्टेंबर रोजी बँकेच्या 68 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमांमध्ये बीड येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी राजाभाऊ मुंडे, रामकृष्ण बांगर, बीड जिल्ह्यातील सर्व सहकारी सेवा सोसायटी चेअरमन व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भगवान शिनगिरे यांच्यासोबत सहकारी सेवा सोसायटीचे सचिव अरुण पडोळे, शरद आजबे जेष्ठ तपासणीस आष्टी तालुका, महेश कोकणे सचिव, नवनाथ वाघुले चेअरमन सहकारी सेवा सोसायटी शेरी बुद्रुक हे उपस्थित होते. याबद्दल त्यांचे माजी सरपंच सतीश शेठ धस, माजी सरपंच रामशेठ मधुरकर, सभापती दत्तात्रय जेवे, जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे, सरपंच संदीप खकाळ, संजय ढोबळे, विजय खकाळ, सरपंच मिसाळ, सरपंच गंगा शिरसाठ, माजी सरपंच ज्ञानेश्वर गदादे, माजी सरपंच अर्जुन मैंद, रावसाहेब मुटकुळे, भास्कर मुटकुळे, युवराज मुटकुळे, बाळासाहेब खकाळ,ताराचंद कानडे, व्हाईस चेअरमन विष्णू गायकवाड, विठ्ठल शेलार, मुकेश नवले सह आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
************************
stay connected