लाडझरीचे माजी सरपंच आत्माराम चाटे यांचे निधन ; हरिहर आत्माराम चाटे यांना पितृशोक

 लाडझरीचे माजी सरपंच आत्माराम चाटे यांचे निधन ;
हरिहर आत्माराम चाटे यांना पितृशोक



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी तालुक्यातील मौजे लाडझरी येथील माजी सोसायटी चेअरमन, माजी सरपंच आत्माराम दत्तात्रय चाटे यांचे शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्यांच्या पार्थीवावर  रविवार दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता लाडझरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला .

         हरिहार आत्माराम चाटे, शिवकरण आत्माराम चाटे, शामकरण आत्माराम चाटे यांचे वडील माजी सरपंच आत्माराम दत्तात्रय चाटे हे परळी तालुक्यातील मौजे लाडझरी येथील मुळ रहिवाशी असुन मृत्यु समयी त्यांची वय ६७ वर्ष होते. त्यांच्या पश्‍चात ३ मुले,१ मुलगी, सुन,जावई, नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या पार्थीवावर परळी तालुक्यातील लाडझरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . माजी सरपंच आत्माराम चाटे हे लाडझरी व बीड जिल्हात सर्व परिसरात सुपरिचीत होते. सरपंचपद तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य पद ही त्यांनी सांभाळले आहे.  त्यांचे व्यक्तिमत्व रूबाबदार तर होतेच शिवाय ते सोज्वळ, शांत व तितकेच शिस्तीचे कडक होते. सर्व सामान्य व तळागाळातील लोकांशी दांडगा जनसंपर्क असलेले व्यक्तीमत्व होते.  ते नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर होते.शेतीनिष्ठ प्रगतशिल शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांनी कष्टाने आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. लाडझरी व परिसरात त्यांचा नावलौकिक होता. लाडझरी गावचे सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांचे गावच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. मागील कांही दिवसापासुन ते आजारी होते. यातच शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. 


चाटे व दहिफळे आदी कुटुंबियांचे डॉ. संतोष मुंडे यांनी केले सांत्वन




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चाटे व दहिफळे परिवारांचे डॉ. संतोष मुंडे यांनी त्यांच्या घरी भेटी देऊन सांत्वन केले. 

         लाडझरी येथील माजी सोसायटी चेअरमन, माजी सरपंच आत्माराम दत्तात्रय चाटे यांचे निधन झाले. यांच्या दुःखद निधनाबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी चाटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.तसेच कै. आत्माराम आण्णा चाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.तालुक्यातील एक मनमिळावू व्यक्तिमत्व असे सर्वपरिचित असलेले माजी सोसायटी चेअरमन, माजी सरपंच आत्माराम दत्तात्रय चाटे यांनी लाडझरी येथील येथे धार्मिक, शैक्षणीक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सहभाग होता चाटे यांच्या निधनाने त्यांच्या जाण्याने ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व हरपला अशा शब्दात डॉ. संतोष मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. हरिहार आत्माराम चाटे, शिवकरण आत्माराम चाटे, शामकरण आत्माराम चाटे व चाटे कुटुंबिय उपस्थित होते. 

          तालुक्यातील सुपरिचित व्यक्तिमत्त्व माजी तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव दहिफळे यांच्या दुःखद निधनाबद्दल धनंजय मुंडे आरोग्य योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दहिफळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिवाजीराव दहिफळे आपल्या शासकीय सेवेच्या कार्यकाळातही एक संयमी व सहकार्यवृत्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. डॉ. संतोष मुंडे, श्रीनिवास मुंडे व इतर नागरिक यांच्यासह दहिफळे कुटुंबियांचे सांत्वन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य वैभव दहिफळे व दहिफळे परिवार उपस्थित होते







.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.