गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्याकडून विसर्जन मार्ग विहिरीची पाहणी

 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्याकडून विसर्जन मार्ग विहिरीची पाहणी

********************************




*********************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी नगरपंचायत अंतर्गत साजरा होणाऱ्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वूभूमीवर नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी,नगरसेवक यांच्या कडून विसर्जन मार्ग तसेच विसर्जन विहिरीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात करत पाहणी केली.

         आष्टी शहरात गणेश उत्सव सर्व मंडळे मोठ्या उत्साहात साजरा करतात.तसेच काही मंडळळात नवसाचा गणपती आहेत. या गणेशोत्सवाचे दरवर्षी नगरपंचायतकडून मिरवणूक, विसर्जन मार्ग,विहीर या बाबी अतिशय उत्कृष्ट नियोजन करते. मंडळांना अडचणी व इतर बाबींची पूर्तता करत उपाययोजना राबवते. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष जिया बेग यांनी विसर्जन मार्ग व विहिरीची पाहणी करत आवश्यकता उपाययोजना राखण्यास सुरुवात केली आहे. यावेळी मुख्याधिकारी बाळदत्त मोरे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,गटनेते किशोर झरेकर नगरसेवक सुरेश वारंगुळे,भारत मुरकुटे,शरीफ शेख,इर्शान खान,समीर शेख,प्रशासकीय अधिकारी अजिनाथ गीते उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.