मराठा आरक्षणाच्या लढ्यात आम आदमी पार्टी बीड जिल्हा आंदोलकांच्या पाठीशी : प्रदिप थोरवे
*--------------------------------------*
संदिप जाधव/आष्टी
गेली तीस वर्षांपासून मराठा आरक्षणाचा चाललेला लढा आज पर्यंत सुरुच आहे.
गेली पंधरा दिवसांपासून जालना येथील मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.
तरीही या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला जाग येते नाही.
अजुन ही त्यांनी मराठा समाजाचा कुठेच विचार करताना दिसत नाही.या राज्य सरकारची मराठ्यांविषयी कायमच निगेटिव्ह भुमीका आहे.
त्यामुळे मी या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करतो.अशी संतप्त प्रतिक्रिया आपचे युवा उपाध्यक्ष प्रदीप थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने
आष्टी तालुक्यातील केळसांगवी, चोभानिमगांव, बेलगाव, चिंचाळा या गावांना भेटी देऊन या आंदोलनकर्त्या तरुणांची तब्येतीची विचारपुस केली. आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप थोरवे व आष्टी तालुका अध्यक्ष डॅा महेश नाथ यांनी युवक सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे व जालना येथे झालेल्या मराठा आरक्षण उपोषणामध्ये झालेला लाठीचार्ज, व मराठा समाजाच्या मुलांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घेणे बाबत तसेच लाठीचार्ज करणाऱ्या अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करणे यासाठी उपोषणास बसलेल्या गांवकर्यांना बीड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर पाठींबा दिला आहे.. यावेळी सोबत शैलेश थोरवे, पत्रकार अविनाश कदम साहेब, साबळे साहेब व आप चे कार्यकर्ते उपस्थित होते.



stay connected