घाटापिंपरी येथील उपोषणकर्त्यांचा मनोज जरांगेशी संवाद : सातव्या दिवशी शाळकरी मुलांच्या हस्ते उपोषण सोडले

 घाटापिंपरी येथील उपोषणकर्त्यांचा मनोज जरांगेशी संवाद : सातव्या दिवशी शाळकरी मुलांच्या हस्ते उपोषण सोडले 



धामणगाव प्रतिनिधी 


आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अतरवली वराटी ता.अंबड जि. जालना येथे  सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पत्रकार अंकुश तळेकर व पोपट तळेकर हे आज गुरुवार दि ७ पासून आमरण उपोषणास बसले होते बुधवार दि १३ रोजी मनोज जरांगे यांच्याशी येथील उपोषणकर्त्यांनी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधल्यानंतर त्यांच्याच सल्ल्याने शाळकरी मुलांच्या हस्ते ज्यूस घेऊन आष्टीचे नायब तहसीलदार बाळदत्त मोरे अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे  यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी घाटा पिंपरी व पंचक्रोशीतील महिला पुरुष अबाल वृध्द व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने होते. 

               गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मुख्य मागणी घेऊन समाजाने अनेक आंदोलने केली. जगाला हेवा वाटावा असे मुक मोर्चे काढले.परतू सरकारने कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण दिलेच नाही.शांततेच्याच मार्गाने जालना जिल्ह्यातील अतरवली येथे मनोज जरांगे यांनी याच समाजाच्या प्रश्नासाठी व ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले तरच ते टिकेल यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला.मात्र अहिंसा मार्गाने बसलेल्या आंदोलकांवर पोलीस प्रशासनाकडून अमानुष असा लाठीहल्ला करण्यात आला.त्यामध्ये अनेक महिला पुरुष अबाल वृध्द यांना बेदम मारहाण करण्यात आली म्हणून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी अनेक  ठिकाणी उपोषण सुरू आहेत तरी आणखी देखील सरकारने ठोस भूमिका आरक्षणाच्या बाबतीत जाहीर केलेली नाही.त्यांची प्रकृती गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गावागावात आंदोलन उपोषण त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सूरु आहेत. घाटा पिंपरी ता आष्टी येथे देखील सामाजिक कार्यकर्ते अंकुश तळेकर आणि पोपट तळेकर यांनी  गुरुवार दि ७ रोजी सकाळी १० पासून आमरण उपोषण सूरु केले होते उपोषणाचा आज सातवा दिवस होता. येथील उपोषणकर्त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला यावेळी त्यांनी उपोषण सोडा असा सल्ला दिला म्हणून उपोषण मागे घेण्यात आले यावेळी २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी उपोषण काळात सरकारचा निषेध करण्यासाठी गावात शनिवार दि ९ रोजी सायंकाळी सहा वाजता हनुमान चालीसा व हनुमानाची महाआरती आयोजित केली होती.रविवार दि १० रोजी सकाळी ९ शासनाची प्रतिमात्मक प्रेत यात्रा काढली व दफनविधी केला सोमवार दि ११ रोजी सरकारचा दशक्रिया विधी करुन ५१ युवकांनी मुंडन करुन सरकारचा निषेध नोंदवला तर बुधवार दि १३ रोजी हनुमान विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार बाळदत्त मोरे  अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे डॉ राऊत साहेब जेष्ठ नेते हरीभाऊ दहातोंडे माजी जि प सदस्य रामहरी महानोर विजय पोटे युवा सरपंच शिवा शेकडे युवक नेते महादेव डोके देवळालीचे सरपंच पोपट शेकडे मंडळधिकारी औधकर तलाठी केमधरणे ग्रामसेवक भवर पोलिस हवालदार एकसिंगे तुषार वामन माजी सरपंच संतोष तळेकर शैलेश मोहिते अमोल तळेकर दिलीप तांदळे डॉ विष्णू साबळे सुभाष तांदळे घाटा पिंपरी येथील सरपंच उपसरपंच ग्रा प सदस्य व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.