मरावे परी कीर्ती रूपे उरावे ॥
- ह.भ.प.काशीनाथ महाराज गणेशगड --
मंदिरासमोर पाच लक्ष रु. किमतीचा सभामंडप उभारणार-युवानेते जयदत्त भैय्या धस
-------------------------------------
देवळाली (वार्ताहार )मानवी जीवन जगताना असे जगले पाहिजे की माणूस मेल्यानंतरही कित्येक वर्ष त्याची कीर्ती पाठीमागे अजरामर राहिली पाहिजे आज ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन जवळपास ७०० च्या वर वर्ष झाले आहेत तरी त्यांची कीर्ती अजूनही अजरामर आहे व ती चंद्र सूर्य असेपर्यंत आशीच राहणार आहे . किर्ती रुपी असणारे कामे करून मानवी जीवन असेपर्यंत असे जगले पाहिजे की मरणानंतर सुद्धा पाठीमागे त्यांचे नांव निघाले पाहीजे .
आष्टी तालुक्यातील देवळाली (माळीमळा ) येथे सालाबाद प्रमाणे हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी १०ते१२ यावेळेत काशीनाथ महाराज गणेश गड नागतळा यांनी काल्याचे कीर्तन प्रसंगी येदसे चरित्र केले नारायणे । रांगता गोधने राखीत आहे ॥ या संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण करताना काशिनाथ महाराज यांनी काल्याचे किर्तनातून सांगीतले
आज जगामध्ये माणसे जीवन जगतात परंतु मेल्यानंतर त्यांचे नाव कोठेच निघत नाही त्याचे कारण म्हणजे ते जन्माला येऊनआठवणीत राहील असे कीर्तीवंत कामे करत नाहीत , मरावे परी कीर्तीरूपी उरावे या उक्तीप्रमाणे माणसाने जन्माला येऊन चांगले कार्य केले पाहिजे , गळ्यामधे तुळशीमाळ घालून एकादशी व्रत केले पाहीजे , जीवन जगताना परोपकारी जीवन जगले पाहिजे असेही ते म्हणाले,यावेळी युवानेते जयदत्त आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,मा.आ.सुरेश धस यांच्या आमदार फंडातून पाच लक्ष रु.किमतीचा सभामंडप लवकरच करण्यात आहे,या कार्यक्रमासाठी ह.भ.प.दिनकर महाराज तांदळे, मधूकर महाराज पवार ,कोल्हे महाराज युवा नेते जयदत्त धस , शिवाजी नाकाडे , सरपंच मोहन आमटे , सरपंच प्रल्हाद मुळीक , सरपंच पोपट शेकडे,भागचंद झांजे अतुल जवणे तसेच पंचक्रोशीतील भावीक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते यावेळी महाप्रसादाचे अन्नदाते बाबासाहेब शेकडे यांचा महाराजांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली, व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोकशेठ तळेकर व नवनाथ शेकडे यांनी केले .
stay connected