शिरापूर व टाकळी अमिया येथील शिवावर परमेश्वर किसन देवकर यांच्या विहीरीचे शासकीय अनुदांनाचा लाभ घेतला दुसर्याने.

 शिरापूर व टाकळी अमिया येथील शिवावर परमेश्वर किसन देवकर यांच्या विहीरीचे शासकीय अनुदानाचा लाभ घेतला दुसर्याने.




कडा/प्रतिनिधी.


आष्टी तालुक्यातील शिरापुर व टाकळी अमिया येथील रहिवासी असलेले शिवावर परमेश्वर किसन देवकर यांची शेती असून सर्वे नंबर 141हा आहे त्या शेतामध्ये परमेश्वर किसन देवकर , तुकाराम किसन देवकर ,अदिक परमेश्वर देवकर याची स्वतंत्र विहीर खोदलेली आहे ही विहीर परमेश्वर किसन देवकर यांची आहे या विहीरीला 4 ते5 लाख रुपये एवढा खर्च करून  ती विहीर सिमेंट काँक्रेट मध्ये बांधकाम केले आहे .

 पंचायत समितीच्या आष्टी येथील इंजिनियर व काही कर्मचारी व शिरापुर येथील शेतकरी शिवाजी गंगाराम देवकर व रोजगार सेवक भिमराव गंगाराम देवकर  ग्रामपंचायत शिरापुर यांच्या जिओ टॅगिंग करून संगनमताने 4लाख रुपये अंदाजे  रक्कम शासकीय अनुदांनाचा लाभ घेतला आहे .

तरी परमेश्वर किसन देवकर यांनी पंचायत समिती आष्टी येथे रीतसर तक्रार दिली असून पंचायत समिती येथील काही अधिकारी व शिरापूर येथील दोन शेतकरी शिवाजी गंगाराम देवकर व रोजगार सेवक भिमराव गंगाराम देवकर यांनी शासनाची फसवणूक केली आहे तरी पंचायत समिती आष्टी येथील अधिकारी व या दोन शेतकऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परमेश्वर किसन देवकर यांनी तेजवार्ताशी बोलताना केली आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.