पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये बिझ बाजार मोठ्या उत्साहात संपन्न.
पोदार इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर मध्ये मुलांचे व्यवहारिक ज्ञान वाढवण्यासाठी, त्यांना आर्थिक व्यवहारांची माहिती होण्यासाठी, तसेच पैशाची देवाण-घेवाण कशी करावी? व्यवहार कसे करावे? यासाठीच 'बिझ बाजार' हा उपक्रम राबविण्यात आला.ह्या बिझ बाजार उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर मध्ये बिझ बाजार आयोजित करण्यात आला होता. या बिझ बाजारला अनेक पालकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी व मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहाने भेट दिली. या निमित्ताने मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा हा ही एक उद्देश हा बाजार भरविण्यात होता. या दृष्टीने मंजुषा आर्ट, गौड आर्ट, ओरिगामी अशा विविध कलांच्या माध्यमातून मुलांनी विविध वस्तू तयार केल्या होत्या. उदाहरणार्थ पेंटिंग, फ्रेम, रुमाल, तोरण, फुलदाण्या, वॉलपीस, शोपीस, विविध आकारातील हंड्या अशा अनेक प्रकारच्या वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. शिक्षकांनी त्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले होते. या सर्व वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, तसेच तर खाद्यपदार्थांची माहिती होण्याच्या दृष्टीने मुलांनी खाद्यपदार्थांचे ही स्टॉल लावले होते. त्यातून बोलायचे कसे, आपापसातील व्यवहार कसे व्हावे, याविषयी मुलांना माहिती व्हावी हाच उद्देश हा बाजार भरवन्यात होता. आणि त्यासाठीच हा उपक्रम राबविण्यात आला. यातून मुलांना विविध विषयांचे ज्ञान मिळाले. अनुभव आला. हा बिग बाजारला मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. एखाद्या यात्रेचे स्वरूप यावेळी पोदार इंटरनॅशनल स्कूलला आले होते. पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्साह भरभरून वाहत होता. हा बिझ बाजार उपक्रम राबवल्याबद्दल अनेक पालकांनी शाळेचे प्राचार्य मा. श्री मंगेश जगतापसर व सर्व शिक्षकांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे उदघाटन करताना शाळेचे प्राचार्य मा. श्री. मंगेश जगतापसर म्हणाले आम्ही नेहमीच मुलांचा सर्वागीण विकास होण्यासाठी, मुले सर्वगुणसंपन्न होण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्या दृष्टीने हा बिझ बाजार उपक्रम राबविला. जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल या दृष्टीने शाळा नेहमीच प्रयत्न करत राहते ज्यातून विद्यार्थ्यांना आनंद तर मिळेलच त्या बरोबर मुलांना पैशाचे महत्त्व समजेल. या बाजाराला भेट देताना पालकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देताना शाळेचे प्राचार्य मा. श्री मंगेश जगताप सर व शिक्षकांचे आभार तर मानलेच त्याचबरोबर असे कार्यक्रम नेहमीच राबवित असल्या बद्दल कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आनंदाबरोबर त्यांचा विकास होण्यासाठी शाळा राबवत असलेल्या अशा उपक्रमांमध्ये आम्हीही सहभागी होऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी प्राचार्यांना दिले. हा 'बिझ बाजार' हा मेळावा यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न घेतले.
stay connected