तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत महात्मा गांधी शाळेचे सुयश 14 वर्षे वयोगटात सय्यद नदीम अली तर 17 वर्षे वयोगटात समाधान खवळे तालुक्यात प्रथम

 तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत महात्मा गांधी शाळेचे सुयश
14 वर्षे वयोगटात सय्यद नदीम अली तर 17 वर्षे वयोगटात समाधान खवळे तालुक्यात प्रथम



आष्टी/ प्रतिनिधी

जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय आष्टीच्या दोन विद्यार्थ्यांनी  कुस्ती आखाड्यात नेत्र दीपक यश संपादन केले असून दोघेही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

आष्टी येथील तंजी मे तरक्की शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय आष्टी चे विद्यार्थी सय्यद नदीम अली वयोगट 14 वर्ष वजन गट 75 गटांमध्ये विजयी झाला असून त्याने या वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला तर 17 वर्ष वयोगटामध्ये 48 किलो वजन गटात खवळे समाधान सुभाष याने घवघवीत असे यश मिळवून या वयोगटातून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवल्या असून दोन्हीही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण सभापती मिर्झा नियामत बेग, न. प . आष्टी चे नगरसेवक मिर्झा अस्लम बेग , मिर्झा उबेद बेग, शहाना बाजी, शाळेचे मुख्याध्यापक तथा पत्रकार जावेद पठाण, प्राचार्य फारुकी इद्रिस, मुख्याध्यापिका श्रीमती नसरीन शेख,सर्व श्री शिक्षक संतोष सायकड, श्रीमती अर्चना हजारे, हनुमंत पोकळे, संदेश जगताप, सय्यद वाहेद, सचिन कावळे,श्रीमती गोरे मॅडम, एमडी लटपटे,वाहेद भाई ,शेख वसीम आदींनी अभिनंदन केले आहे.व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.