Nandkumar Nanaware succide case आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

Nandkumar Nanaware succide case आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण



 उल्हासनगर दि :- (रमेश कांबळे)उल्हासनगरच्या दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी आपल्या पत्नीसह राहत्या बंगल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

 याप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने उल्हासनगर-अंबरनाथ शहरात अटकसत्र सुरू केले होते. यात ओमी कलानी यांच्या खास मर्जीतील सहकारी कमलेश निकम, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, शिंदे गटाचे वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी गणपती कांबळे, नरेश गायकवाड या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर येथे राहणारे नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून पत्नी उज्ज्वला हिच्यासह उडी घेत आत्महत्या केली होती. ननावरे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांनी परिधान केलेल्या कपड्यामध्ये एक चिठ्ठी पोलिसांना आढळून आली होती. त्यामुळे या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करत त्यानंतर संग्राम निकाळजे आणि इतर तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र त्यानंतरही या घटनेच्या तपासला वेग येत

आरोपींमध्ये शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या स्वीय सहाय्यकाचा समावेश

ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई

शुक्रवारी दुपारी ठाणे खंडणीविरोधी पथकाने ओमी कलानीच्या मर्जीतील सहकारी कमलेश निकम आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे तसेच शिंदे गटाच्या वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी गणपती कांबळे व नरेश गायकवाड यांची नावे नंदकुमार यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद असल्याने या चार जणांना अटक केली आहे. त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या चारही आरोपींना पोलिसांनी शनिवारी उल्हासनगर सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करत गुरुवारी नंदकुमार ननावरे यांचे मोठे बंधू धनंजय ननावरे यांनी एक व्हिडीओ व्हायरल करत स्वतःचे बोट कोयत्याने तोडून गृहमंत्र्यांना भेट पाठवणार असल्याचे सांगितले होते.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.