यश आजबे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन
कडा ( प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट, मराठवाडी तसेच हरेवाडी येथे आ. बाळासाहेब आजबे यांचे पुत्र युवानेते यश भैया आजबे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुसंपादन करण्यात आले आहे.
आ. बाळासाहेब आजबे यांच्या माध्यमातून आष्टी विधानसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये विकास कामे उभा राहत आहेत. आज दि. 20 रोजी आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट येथे पुलाच्या कामाचे भूमिपुजन, मराठवाडी येथे आंगनवाडीचे तसेच हारेवाडी येथे स्मशान भुमीचे भूमीपूजन आ. बाळासाहेब आजबे यांचे पुञ यश भैया आजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हरिभाऊ दहातोडे, सरपंच शरद दळवी, परशुराम मराठे, मोहन मराठे, जे. बी. औटे, बन्सी भाऊ मराठे, प्रभाकर औटे, आशोक माळी, दिलीप मराठे, वैभव दुधलमल, महादेव मराठे, आश्रय मराठे, नवनाथ मराठे, विकास मराठे, प्रशांत औटे, रामु दळवी, सुनिल हाडे आदि सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


stay connected