E Bus Service - प्रदूषण मुक्तीकडे एक पाऊल..!

 ♦️ E Bus Service -
प्रदूषण मुक्तीकडे एक पाऊल..! 




नुकतेच पी एम ई बस सेवेला केंद्रीय स्तरावर मंजुरी मिळाली असून देशातील १६९ शहरासाठी नव्या १० हजार इलेक्ट्रिक बस गाड्या आता धावताना दिसणार असून, ही बाब स्वागतार्ह आहे,हि योजना ' प्रदूषण मुक्तीकडे ,एक क्रांतिकारी पाऊल' च मानावे लागेल. या नव्याने घेतलेल्या बस सुविधेचा निर्णय नुकताच करण्यात आला असून, या निर्णयात १० हजार बस १६९ शहरासाठी मंजुरी केल्या असून या निर्णयामुळे रोजगाराच्या ही संधी मोठ्या प्रमाणातवर उपलब्ध होणार असून ४५ ते ५५ हजार रोजगार निर्मिती या निर्णयामुळे होणार आहे. या ई-बस सेवेचा शंभर शहरास लाभणार आहे. या सेवेचा लाभ लोकसंख्येनुसार मिळणार असून भारतातील ३ लाख ते ४० लाख लोकसंख्या असलेले १६९ शहर यात आहेत, यातील शंभर शहरात ५ लाख लोकसंख्या असलेले शहरास ५० बसेस तर ५ ते २० लाख लोकसंख्येला असलेल्या शहरास १०० बसेस आणि २० ते ४० लाख लोकसंख्या असलेल्या शहरास १५० बस अशाप्रकारे सेवा दिली जाणार आहे. ही योजना शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासाच्या गतिशीलतेकडे महत्त्वकांक्षी ठरणारी आहे, यामुळे निसर्गाविषयी अधिक प्रेम-भावनांची निर्मिती होऊन पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी या १० हजार बस नव संजीवनी देणाऱ्या ठरणार आहेत. यामुळे प्रवाशांना आपल्या निसर्गा विषयी आपुलकी जिव्हाळा निर्माण होऊन, वाहतक स्वच्छ, हिरवेगार, सक्षम आणि सुरक्षित प्रवास ठरणार आहे.
पारंपारिक इंधननाच्या भविष्याचा विचार जर केला तर तो संपणार असून वेळीच गांभीर्यपूरक विचार करत याविषयी जागरूक राहून कार्य करणे भविष्यासाठी लाभदायक आहे, वाढत चाललेली वाहनाची संख्या याविषयी जगभर चिंतेचा विषय ठरत असून येणाऱ्या काळ ई-वाहनाचा ठरणार आहे हे नक्की. आणि ही बाब मानवाबरोबर संबंध सृपष्टीला लाभदायक ठरणार आहे, हे एक पर्यावरणीय दृष्टिकोनातून क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
लोकसंख्येने मोठ्या असलेल्या भारतातील शहरातील आज विचार केला तर प्रदूषणाच्या विळख्यात आहेत, इंधनाच्या वाहनातून जीवाश्म इंधनाचा वापर होत असल्याने त्याचा प्रदूषणात वाढ होऊन त्या होणाऱ्या प्रदूषणाच्या धुरामधून नायट्रोजन सल्फर, कार्बन यासह अनेक घातक वायू हवेत मिसळत आपल्यासह आपल्या पर्यावरणीय सृष्टीलाही घातक ठरतातच, याबरोबरच निर्जीव वस्तूवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम पाहायला मिळतो, हे नक्की. सजीवाच्या श्वसणावर याचा परिणाम होतो. दाह, दमा, ब्रॉकायटिस असे श्वसनाच्या विकाराला या वायूमुळे सामोरे जाण्याची वेळ येते. नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार उद्धभवतात,या धुरामुळे डोळ्याची जळजळ, खोकला यासह अनेक परिणाम होतात. त्याबरोबरच त्वचेचे विकारही मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. हा ई-बसचा निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणारा आहे. प्रदूषण विहिरीत वाहनाचा अंगीकार करणे महत्त्वाचे आहे.आता जागतिक स्तरावर एक उत्तम धोरण ठरवून याला प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे असून जागतिक स्तरावर ई-वाहनाविषयी एकच निर्णय घेऊन  जागतिक प्रदूषणीय रोखणं गरजेचे आहे.तरच जागतिक प्रदूषण मानवासह सृष्टीचे आरोग्य ठणठणीत राहील हे निश्चित.
या योजनेचा उद्देश जरी प्रदूषण रोखण्यासाठी असला तरी तो प्रत्येक शहरासाठी झाला पाहिजे, त्यामुळे निश्चितच वाढत चाललेले वायु प्रदुषण रोखले जाईल.वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या अनेक समस्या आरोग्य धोक्यात घालत असून, माणसागणिस गाड्या हा एक समस्याचा भाग बनत चाललेला असून ई- वाहनाकडे लोक पेट्रोल, डिझेलच्या इंधनावर चाललेल्या वाहना पेक्षा ई- वाहनाला पर्याय म्हणून पहात आहे, या निर्णयामुळे या वाहनांना प्रोत्साहन मिळून या वाहनाचा उपयोग प्रदूषणाबरोबरच, इंधन बचतीवर आणि मानवी आरोग्यावर परिणाम होऊन पर्यायाने प्रदूषण कमी करण्याचा भाग हे ई- वाहन होतील हे नक्कीच. हा निर्णय सरकारने घेतल्याबद्दल अभिनंदन करायला हवे.

- राहुल मोरे
बीड.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.