पोपट गर्जे यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा..

 पोपट गर्जे यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा..




आज दिनांक 7 ऑगष्ट रोजी पोपट गर्जे यांचा विविध सामाजिक पक्ष, मित्र परिवार व पत्रकार बांधवांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

पोपट गर्जे यांना समाज कार्याची असणारी आवड तसेच अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणे.प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर राहणे त्याचबरोबर विविध आंदोलनात सहभाग घेणे अशा अनेक कारणांमुळे पोपट गर्जे यांचे नाव चर्चेत आहे.

काही दिवस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक तालुकाध्यक्ष पदीही काम केले होते.

त्यांच्या कामाची दखल घेऊन नामदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देखील टाकली.

नंतर जय भगवान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी तालुकाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली.व पोपट गर्जे जय भगवान महासंघाच्या तालुकाध्यक्ष पदाची थुरा व्यवस्थीतपणे सांभाळत आहेत.

त्यांचा आज वाढदिवस त्यांना विविध मान्यवरांनी वाढदिवसाच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून व प्रत्येक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, जिल्हा परिषद सदस्य सतिष शिंदे,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवीकाका ढोबळे, पत्रकार संदिप जाधव, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष दिपक गरूड, रमेश शिरोळे,गोविंद मिश्रा, अशोक जाधव बबलू आखाडे, सुनिल जाधव, बाळासाहेब कर्डीले,बंडु ढोबळे,भाऊ मोरे, महेश घोडके, गणेश खाडे, पत्रकार संजय खंडागळे,नितिन कांबळे, विशाल घोडके, किशोर घोडके अमोल साळवे राम घोडके, अविनाश घोडके,सह सर्व मित्र परिवारांनी शुभेच्छा दिल्या.


तेजवार्ता प्रतिनिधी संदिप जाधव कडा/आष्टी





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.