पाचोरा येथील पत्रकारांवरील हल्ला निषेधार्थ पुरोगामी पत्रकार संघाचे तहसील कार्यालयास निवेदन
==========================
केज प्रतिनिधी
पाचोरा (जि.जळगाव) येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर गेल्या आठवड्यात काही गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याच्या निषेधार्थ केज येथील पुरोगामी पत्रकार संघ यांच्या वतीने दि. 12 ऑगस्ट रोजी केज येथील तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण जनता विश्वासाने पाहते अशा पत्रकारावर दिवसेंदिवस वाढत झालेले हल्ले हे लोकशाहीसाठी घातकच आहेत. अशाच प्रकारचा हल्ला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भर दिवसा चौकामध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. याच्याच निषेधार्थ आणि हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी केज तालुका पत्रकार संघाच्या वतीने केज तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले. यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे केज तालुका अध्यक्ष रंजीत घाडगे, सचिव अनिल वैरागे, ता कार्याध्यक्ष जयदत्त गायकवाड, ता संघटक दिनकर जाधव,ता उपाध्यक्ष अमोल सावंत यांच्यासह जिल्हा सचिव राजकुमार धिवार उपस्थित होते.
पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारावरील हल्ले वाढत आहेत अशा घटनांना आळा बसावा व कायद्याच्या वचक राहावा याकरिता पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी ही मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.


stay connected