आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा
पावसाने दडी मारल्याने बाजारपेठा ही थंडावल्या
उडिद पिक मर रोगाने जळाले पावसाअभावी पिकाची वाढ खुंटली उत्पन्नात ही घट होणार शेतकरी चिंतेत
देवळाली प्रतिनिधी अतुल जवणे :
तालुक्यात पावसाळा सुरू होऊन २ महिने उलटून गेले तरीही अद्याप मोठा पाऊस झाला नाही रिमझिम पावसाशिवाय मोठा पाऊस झाला नाही ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिले शेतकऱ्यांना याच रिमझिम पावसावरच पुरेशी ओल नसताना काळ्या आईची ओटी भरली खरीपाची पेरणी केली रिमझिम पावसावरच कसीबसी पिके आली उडिद अक्षरशः खोडमाशी व मर रोगाने ४० हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे.पिकाची वाढ खुंटली उत्पन्नात ही घट होणार आहे.२ महिने उलटून ही धरणे तलावाची पाणी पातळी तळालाच आहे.या महिन्यात जर पाऊस नाही झाला तर दुबार पेरणीचे संकट ओढावेल मागिल १५ दिवसांपासून रिमझिम सुद्धा पाऊस नसून पावसाने दडी मारल्याने बाजारपेठा थंडावल्या आहेत.परिणामी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.शेतक-यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
तालुक्यात अडीच महिने पावसाळा उलटून देखील तलाव धरणांची पाणी पातळी तळालाच आहे.शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या पूर्ण केल्या परंतु आता पिके पाण्यावाचून सुकु लागली आहेत.पावसाची आवश्यकता आहे.मागिल वर्षी चांगला पाऊस झाला पिके चांगली आली यावर्षी ही चांगले उत्पन्न होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने पेरणी करून महागडी खते , बियाणे, औषधे यावर मोठा खर्च केला आहे.परंतु पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.उडिद,तुर,कापुस, सोयाबीन,मका,बाजरी,कांदा,आदी पिकांना पाऊस पडला तर जिवनदान मिळणार आहे.अन्यथा दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढावेल पावसाने दडी मारल्यामुळे नदी नाल्या तलाव कोरडे ठाक पडले आहेत.पेरणी केलेल्या पिकांना पाणी कोठून देणार? पिके ८ दिवसांत पाऊस न झाल्यास कसे वाचवणार हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.अद्यापर्यंत पाऊस दमदार झालाच नाही रिमझिम पाऊस होत आहे.आॅगस्ट महिना तर कोरडाच चालला आहे.रिमझिम पाऊस सुद्धा झाला नाही हा हंगाम तरी निदान चांगला निघावा यासाठी शेतकरी मेहनत करत आहेत.त्याला पावसाची साथ हवी आहे.परंतु आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर पिके तग धरतील का?अशी बिकट परिस्थिती आहे.आष्टी तालुक्यातील बळीराजाला केवळ दमदार पावसाची कायम प्रतीक्षा आहे.
पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पिकांवर फवारणी करावी
तालुक्यात ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने दडी मारली आहे खरीप हंगामातील सर्वच पिकांना पाण्याची आवश्यकता असून पिकांना पाण्याचा ताण पडत असल्यास पोटॅशियम नायट्रेट १३:०:४५ विद्राव्य खताची ५० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी जेणेकरून पीक पाण्याचा ताण सहन करून आठ ते दहा दिवस टिकू शकते
- गोरख तरटे ( तालुका कृषी अधिकारी, आष्टी )
बळीराजाच्या अडचणीत भर
यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने नैसर्गिक संकटाचे सावट तालुक्यावर कायम आहे.सध्या ऊन - सावलीचा खेळ अन सोसाट्याचा वारा सुरु आहे ८ ते १० दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांच्या डोकावर पिके वाचविण्याची नैसर्गिक संकटाची टांगती तलवार कायम आहे.यावर्षी तरी निसर्ग अवकृपा दाखवणार नाही अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे.मात्र १५ दिवसांपासून पाऊस न झाल्याने आॅगस्ट महिना संपण्याच्या उंबरठ्यावर असताना देखील मोठा पाऊस झाला नाही यामुळे शेतकऱ्याचे काळीज तुटत आहे.अजून ही म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.



stay connected