अपघातात पोलिस पत्नीचा जागीच मृत्यू

 अपघातात पोलिस पत्नीचा जागीच मृत्यू



 धामणगाव (प्रतिनिधी ) : - कर्जत येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात अंमलदार म्हणून कार्यरत असलेले सागर जंगम हे नातेवाइकांना भेटण्यासाठी गुरुवारी कारने पत्नी भावना जंगम (२८) व मुलासह निघाले होते. पैठण-बारामती रोडने जात असताना आष्टी तालुक्यातील खरकटवाडी येथे भावना यांना उलटीचा त्रास होऊ लागला. त्या खाली उतरल्या असता धामणगावकडून पाथर्डीकडे जाणाऱ्या भरधाव पिकअपने जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाले. पिकअपचालक वाहनासह पसार झाला. घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, कर्जतचे उपअधीक्षक वाघारे, अंभोराचे सहायक निरीक्षक महादेव ढाकणे, हवालदार बाबू तांदळे, सुवर्णा पालवे, शिवदास केदार यांनी भेट दिली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.