पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना चपलाने मारा.
आढावा बैठकीत आ.बाळासाहेब आजबे यांचा रुद्रावतार
आष्टी (प्रतिनिधी )
मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आपण कोणाचीही गय करणार नाही नागरिक कामे घेऊन शासकीय कार्यालयात येतात तेव्हा सिंचनविहीरी ,शेततलाव, घरकूल यासारख्या कामासाठी संबंधित अधिकार्याकडून पैश्याची मागणी केली जाते जे अधिकारी जनतेच्या कामासाठी पैशाची मागणी करत असतील अशा अधिकाऱ्यांना चपलाने मारा अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.नसता पुढील कारवाई करावी लागेल असा सज्जड इशारा आ.बाळासाहेब आजबे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित आष्टी तहसील कार्यालयातील विकास आढावा बैठकी मध्ये अधिकाऱ्यांना दिला...
भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त आष्टी तहसील येथील ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आष्टी तहसील कार्यालयात आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार साहेबराव दरेकर माजी जि प अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, ज्येष्ठ नेते बलभीम सुंबरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची तालुकाध्यक्ष अशोक साळवे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष वाल्मीक निकाळजे, तहसीलदार प्रमोद गायकवाड, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या सर्व खाते विभागांचे प्रमुख उपस्थित होते, या आढावा बैठकीत अनेक दिवसानंतर अधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आ. बाळासाहेब आजबे काका यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला ,यावेळी बोलताना आ.बाळासाहेब आजबे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक हे छोटी मोठी कामे घेऊन शासकीय कार्यालयात येत असतात कोणत्याही कामासाठी पैशाची मागणी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून केली जाते याबाबत अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या असून यापुढे कोणत्याही कामासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी करण्यात आली तर त्यांना त्याच ठिकाणी चपलाने मारा..
आम्ही गप्प आहोत म्हणजे याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही असा नसून..आम्ही काही करू शकत नाही असा समज अधिकाऱ्यांनी मुळीच करून घेऊ नये ..
मी तक्रारीचे पत्र दिले तर तुमच्यावर कारवाई व्हायला वेळ लागणार नाही..
परंतु तुमच्या अन्नात माती कालवणे माझ्या स्वभावात बसत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊ नका जर तुम्ही सर्वसामान्य जनतेकडून पैशाची मागणी करत असाल तर मी गप्प बसणार नाही यापुढे सर्वसामान्य जनतेची कामे प्राधान्याने करावीत तुमच्या कडून जर होत नसतील तर तुम्ही तालुका सोडून दुसऱ्या ठिकाणी बदली करून घ्यावी नसता मला सांगा मी बदली करून देतो परंतु अशा प्रकारचे गैरवर्तन यापुढे खपवून घेतले जाणार नाही कोणाचेही नाव सांगून नको ते उद्योग या मतदारसंघात चालू आहेत ते तात्काळ थांबवा नसता कारवाईसाठी तयार राहा असाच सज्जड इशारा यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी अधिकाऱ्यांना दिला.










stay connected