बीड जिल्हयामधे मिशन आपुलकी योजना राबविण्यात यावी- अमर वाळके
- प्रत्येक गावामध्ये विविध योजनांवर शासकीय निधी खर्च होतो परंतु कुठेतरी ज्या गावातून शाळेतून अंगणवाडीतून शिकून मोठे झालेले लोक विद्यार्थी बीड जिल्ह्याच्या विविध पार्ट मध्ये महाराष्ट्राच्या विविध पार्ट मध्ये आपल्या देशाच्या आणि परदेशात सुद्धा आपले लोक मोठमोठ्या पदावर कार्य, नोकरी करत आहेत काही लोक इंजिनियर आहेत, काही लोक डॉक्टर आहेत,काही शिक्षक आहेत, काही राजकारणात मोठ मोठ्या पदावर आहेत, काही लोक सैन्य दलामध्ये आहेत, सगळे मोठे पदावर आहेत परंतु आपण कुठेतरी आपल्या गावासाठी आपल्या गावातील शिक्षण, अंगणवाडी, आरोग्य या विषयावर काहीतरी केले पाहिजे म्हणून या प्रकारे आपण गावचं काहीतरी ऋण फेडण्यासाठी मिशन आपुलकी बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात, गाव स्तरावर ही योजना राबविण्यात यावी. गाव स्तरावर जे लोक मोठमोठ्या पदावर आहेत त्यांची एक समिती तयार करावी गावातील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची एक समिती तयार करावी या मिशन आपुलकीमध्ये आपण शिक्षण, आरोग्य, अंगणवाड्या सुधारणा करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न केले पाहिजे,आपल्यासारखी आपण ज्या शाळेतून शिकून मोठे झालो असेच आणखी गावातील विद्यार्थी शिकून मोठे झाले पाहिजे या भावनेतून आपण या मिशन आपुलकी योजनेतून काम केले पाहिजे हे सर्व करण्यासाठी बीड जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपण पुढाकार घेऊन जिल्हास्तरावर एक मिशन आपुलकी योजनेचे परिपत्रक काढावे परिपत्रक काढून जिल्ह्यातील प्रत्येक गावात आपण समिती तयार करण्याच्या सूचना द्याव्यात जे गाव चांगले काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्वरूपात एक अभियान राबवावे जेणेकरून इतर गावांना चांगले काम करण्यासाठी हेवा वाटावा. ही योजना या आधी अहमदनगर, नांदेड जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेली आहे या योजनेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आपण जिल्हास्तरावर मिशन आपुलकी बीड हे पोर्टल खोलावे.माननीय बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम व बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाठक साहेब आपल्याला विनंती करण्यात येते की आपण या मिशन आपुलकी योजना बीड जिल्ह्यामध्ये चालू करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
अमर वाळके, सुंबेवाडी ता आष्टी जि बीड.
मो.९०७४२१७९७१
८२८१९५८०३०
stay connected