आ.आजबेंच्या वाढदिवसानिमित्त नांदा जि.प.प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप
शरद वसंतराव औटे यांच्याकडून काकांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम !
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघाचे लाडके आमदार बाळासाहेब आजबे (काका) यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्राथमिक शाळा नांदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदा व बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ नांदा व शरद वसंतराव औटे यांच्या पुढाकारातून मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बाळासाहेब आजबे मित्र मंडळ नांदा व शरद वसंतराव औटे यांच्या मार्फत दरवर्षी विविध उपक्रम राबवत काकांचा वाढदिवस साजरा केला जातो याही वर्षी नांदा येथील शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य सैनिक पारूबाई माणिकराव औटे यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी शिंदे सर,सरोदे सर,मा सरपंच नांदा राधाकॄष्ण औटे,स्वातंत्र्य सैनिक पारूबाई औटे,अंगणवाडी शिक्षीका भाग्यश्री गजघाट,शरद औटे पोस्टमास्तर,बारकु गजघाट,अतुल औटे,राहुल औटे,व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
काकांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमानेच – शरद वसंतराव औटे
गेल्या चार वर्षापासून आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त समाज हिताचे विविध उपक्रम घेत वाढदिवस साजरा करत आहोत याही वर्षी आम्ही नांदा येथील प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला. यापुढे देखील असेच विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करत राहू.
अशी माहीती शरद वसंतराव औटे यांनी प्रसार माध्ममांशी बोलताना सांगीतली
stay connected