ननावरे दापंत्य आत्महत्या प्रकरण उघड मृत्युपूर्व जबानीत खळबळ

 ननावरे दापंत्य  आत्महत्या प्रकरण उघड
मृत्युपूर्व जबानीत खळबळ




उल्हासनगर दि:- उल्हासनगरातील दिवंगत माजी आमदार ज्योति कलानी यांचे स्वीय सहायक नंदकुमार ननावरे यांनी मंगळवारी आपल्या पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केली.

 ननावरे यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले असावे याबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत असताना त्यांच्या आत्महत्येचे सातारा कनेक्शन समोर आले आहेत.

 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदकुमार ननावरे यांनी आपली पत्नी उज्वला हिच्यासह मंगळवारी दुपारी आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईल मध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणारा संग्राम निकाळजे या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे .

आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी हा व्हिडिओ पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या निवडक सहकाऱ्यांना पाठवला होता.

 तसेच आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली त्यात देखील संग्राम निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

 या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून विठ्ठलवाडी पोलिसांनी याप्रकरणी संग्राम निकाळजे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे .दरम्यान संग्राम निकाळजे हा कोणाच्या सांगण्यावरून नंदकुमार ननावरे यांना धमक्या देत होता याचा प्राथमिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे .





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.