जीवनात जगणे महत्वाचे नसुन किर्ती, कार्य व विचार रूपी समाजात जिंवत रहाणे महत्त्वाचे आहे - रमेश आडसकर
स्मृतीशेष राम(नाना) घाडगे गुरुजी यांना शोकसभेत वाहिली सर्वपक्षीय शब्दपुष्प श्रद्धांजली
केज (प्रतिनिधी)
केज तालुक्यात आपल्या कार्याचा ठसा प्रत्येक क्षेत्रात उतरून शैक्षणीक , सामाजिक ,धार्मिक , राजकीय क्षेत्रात आपली वेगळी छटा उमटवणारे कालकथित राम घाडगे गुरुजी उर्फ नाना यांचे वृद्धपकाळाने दि.१७ रोजी सोलापुर येथील रुग्णालयात निधन झाले दि.१९ तारखेला त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम संपन्न झाला. केज तालुक्यातील सर्व पक्षाच्या वतीने त्यांचा दि. २० ऑगस्ट रोजी केज येथील शिक्षक पतसंस्थेत सळाळी ११ वाजता शोकसभेचे आयोजन केले होते. सदरील शोकसभेस भाजपाचे जेष्ट नेते रमेशराव आडसकर, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, सुरेशतात्या पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे , कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख ,केज नगरपंचायत नगराध्यक्ष सिताताई बनसोडे , भाजपाचे दत्ता धस , नवाब मामु , रोटरी ऑफ केजचे विकासजी मिरगणे , शेकापाचे भाई मोहन गुंड , काँग्रेसचे माजी ता. अध्यक्ष प्रविण शेप , पोटभरे मॅडम, मराठी पत्रकार परिषदेचे जि. उपाध्यक्ष गौतम बचुटे , भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मस्के आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रथमःता कालकथित राम घाडगे गुरुजी यांच्या प्रतीमेचे धुपदिप पुष्पाने पुजन करण्यात आले त्यानंतर कालकथित राम घाडगे गुरुजी यांच्या कार्यावर विविध मान्यवरांनी प्रकाश टाकत शब्दपुष्प रूपी श्रद्धांजली वाहिली यावेळी राम घाडगे गुरुजी यांच्या विविध पैलुवरीती प्रकाश टाकत रमेश आडसकर यांनी जीवनात जगणे महत्वाचे नसुन किर्ती, कार्य व विचार रूपी समाजात जिंवत रहाणे महत्त्वाचे आहे. व तसे कार्य किर्ती विचार रुपी राम घाडगे गुरुजी आपल्यामध्ये जिवंत आहेत असे श्रध्दाजंली पर मनोगत व्यक्त केले. या शोकसभेचे सुत्रसंचालन हनुमंत भोसले सर यांनी केले तर मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


stay connected