वकिलांकडून सल्ला घ्यायला आला अन् पोलिसांनी सापळा लावून पकडला नराधम चुलत्याच्या पोलिसानी आवळल्या मुसक्या

 वकिलांकडून सल्ला घ्यायला आला अन् पोलिसांनी सापळा लावून पकडला
नराधम चुलत्याच्या पोलिसानी आवळल्या मुसक्या



कडा (प्रतिनिधी) :- पुतणीला धमकी देत घरी कोणी नसल्याची संधी साधुन बलात्कार केल्याची घटना जानेवारीत घडली होती. धक्कादायक म्हणजे या अल्पवयीन मुलीच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी नराधम चुलत्यावर २२ ऑगस्ट रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या पासून तो फरार होता. गुरुवारी सायंकाळी आष्टी येथे वकिलांकडून सल्ला घेण्यसाठी आल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडून अटक केली आहे.


आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या आई बापाला जिवे मारीन अशी धमकी देत पुतणीवर चुलत्याने बलात्कार केल्याची घटना घडली होती. पोटात दुखत असल्याने उपचारासाठी गेल्यावर या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेला वाचा फुटली होती. यातुन पिडीत मुलगी सात महिन्याची गर्भवती राहिली असल्याची धक्कादायक माहीती समोर आली होती. तशा अंभोरा पोलिस ठाण्यात २२ ऑगस्ट रोजी पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून


चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून विवाहित ३० वर्षीय चुलता फरार झाला होता गुरूवारी सायंकाळी आष्टी येथे या गुन्ह्यात वकिलांकडून सल्ला घेण्यासाठी आल्याची माहिती आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांना समजाताच त्यानी पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलीस हवालदार मुद्दहर शेख याच्यासह अंमलदारांनी त्याच्या मुसक्या आवळत अटक केली









Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.