Swiden येथे Kuraan जाळणार्या समाजकंटकाला फाशी द्या मिरजेत Muslim समाजाची मागणी
मिरज -
स्वीडन येथे बकरी ईद दिवशी मुस्लिम बांधव नमाज पठण करून येत असताना हेतूपुरस्सर मुस्लिम समाजाच्या भावना दुखवण्याकरिता त्यांच्या समोर सलावान मोमिका नावाच्या समाजकंटकाने कुरान जाळून जगातील सर्व मुस्लिम बांधवांच्या भावना दुखवल्या. अशा कुप्रवृत्तीचा स्वीडन सरकारने तातडीने उपाययोजना करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मिरजेतील समस्त मुस्लीम समाजाने निवेदनाद्वारे केली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इस्लाम धर्म विरोधी काम चालू आहे. हे काम नक्कीच निषेधार्ह व निंदनीय आहे तरी अशा घटना भविष्यात घडणार नाही याचीही दक्षता संबंधित राष्ट्रांनी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आले आहे.
यावेळी जैलाब शेख, महावीर कांबळे, मेहबूबअली मणेर, मुस्ताक सौदागर, नजीर झारी, सागर दरबारे, सलीम अत्तार, साद गवंडी व जाफर शेख आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते
stay connected