MNS NEWS महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचा फी वाढी विरोधात न्यू इंग्लिश शाळेवर धडक आंदोलन.
उल्हासनगर दि :- न्यू इंग्लिश शाळा, उल्हासनगर -५ यांनी आपल्या मनमानी पद्धतीने अचानक कोणत्याही पालकांना विश्वासात न घेता इयत्ता १ली ते इयत्ता १०वी पर्यंत भरमसाठ फी वाढ केली. त्याअनुषंगाने पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष वैभव माधव कुलकर्णी यांच्याकडे धाव घेतली असता मनविसेचे शिष्टमंडळ सचिन कदम, प्रदिप गोडसे, शैलेश पांडव यांनी १९.०६.२०२३ व ०४.०७.२०२३ रोजी शाळेशी पत्रव्यवहार केला परंतु शाळा प्रशासन यांनी आश्वासन देऊन देखील फी वाढ विरोधात कोणतीही कारवाही होत नसल्याने शुक्रवार दि.०७.०७.२०२३ रोजी न्यू इंग्लिश शाळेवर धडक देत. मनविसे उल्हासनगर शहर अध्यक्ष वैभव माधव कुलकर्णी यांच्या नेतृत्वात फी वाढ विरोधात पालकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
सदर स्वाक्षरी मोहिमेत पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास १०५० फॉर्मचे वाटप झाले त्यात ९५० पालकांनी फॉर्म जमा करत आपला विरोध फी वाढी विरोधात नोंदवला.
सदर प्रसंगी सचिन कदम, शैलेश पांडव, स्वप्नील त्रिभुवन, अशोक गरड, प्रमोद पालकर, सान्नी खिल्लानी, अजय बागुल, वैभव शिंदे, विजय पवार, अक्षय साळवी, भावेश चौधरी आदी उपस्थित होते.
stay connected