Sony tv सोनी टिव्ही या मराठी चॅनलवर झळकणार कुंबेफळ गावची कु ऋतुजा दौलतराव मुठे - सामाजिक कार्यकर्ते:- दादा काळे,

 Sony tv सोनी टिव्ही या मराठी चॅनलवर झळकणार कुंबेफळ गावची कु ऋतुजा दौलतराव मुठे - सामाजिक कार्यकर्ते:- दादा काळे, 



आष्टी तालुक्यातील कुंबेफळ हे अतिशय लहान म्हनजे ७१९ लोकसंख्या असलेले खेडेगाव असुन या आमच्या कुंबेफळ येथील मा.'सरपंच' आदरणीय श्री दौलतराव उत्तम मुठे, यांची मुलगी कु. ऋतुजा दौलतराव मुठे, हिची सोनी टिव्ही चॅनलवर ,सचिन खेडेकर प्रस्तुत, " कोण होणार करोडपती..! या कार्यक्रमामध्ये कमी वयात महाराष्ट्रातून व्हॅाट सिटवर बसण्याचा मान तिने मिळवला आहे. व तसेच तिने ६,४०,००० सहा लाख चाळीस हजार रुपये एवढे बक्षीस मिळवले. त्याबद्दल कु. ऋतुजा दौलतराव मुठे हिचा दिनांक १६ जुलै २०२३ रोजी सकाळी ठिक १०:००वाजता कुंबेफळ जन्मभुमी येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या संख्येने मोठ्या उत्सहात व आनंदात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. व ऋतुजा ला सर्व उपस्थितांच्या वतीने मिळवलेल्या यशाबद्दल व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.. देण्यांत आल्या व सर्वांनी ऋतुजा चे अगदी मनापासून अभिनंदन 🌷केले. अशा प्रकारे सर्व कुंबेफळ ग्रामस्थ व इतर बाहेर गावच्या पंचक्रोशीतील उपस्थीत मान्यवरांच्या वतीने ऋतुजा चा सत्कार समारंभाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्सहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी, सत्कारमुर्ती ऋतुजा हिचे वडिल, कुंबेफळ गावचे मा. 'सरपंच' दौलतराव मुठे यांनी कार्यक्रमाला आलेल्या सर्व उपस्थितांचे सर्वांचे अगदी मनापासून आभार व्यक्त केले.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.