खुंटेफळ साठवन तलावात सुधारीत भुसंपादनाच्या कायद्याप्रमाने अगोदरच्या शेतकर्यांना ३ पट मोबदला मिळवुन द्या- प्रदिप थोरवे आप जिल्हा उपाध्यक्ष

खुंटेफळ साठवन तलावात सुधारीत भुसंपादनाच्या कायद्याप्रमाने अगोदरच्या शेतकर्यांना ३ पट मोबदला मिळवुन द्या- प्रदिप थोरवे आप जिल्हा उपाध्यक्ष




सध्या खुंटेफळ साठवन तलावाच्या कामसंदर्भात दोन्ही आमदारांनमधे श्रेयवादवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यामधे आता आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा युवा उपाअध्यक्ष प्रदिप थोरवे यांनी उडी घेतली आहे. हा तलाव सुरु होताना सगळ्यात आधी माझ्या कुटुंबियानी खरेदी दिली म्हनुन  थोडेफार श्रेय आम्हालाही द्या असा टोला थोरवे यांनी लगावला आहे. आपन लवकरचं दोन्ही आमदारांना भेटनार असुन ज्या खुंटेफळ करांनी सुरवातीला जमीनीच्या खरेदी दील्या आणि प्रकल्प सुरवातीला सुरु होन्यास मदत केली. परंतु प्रकल्प सुरु होवुन दुसर्ऱ्याच वर्षी भुसंपादनाचा सुधारीत कायदा आला,आणी ज्यांची जमिन भुसंपादन झाली नाही त्यांना बाजारभावापेक्षा ३ पट अधिक मोबदला दिला जानार हे निश्चित झाले. तेव्हा पासुन ची खुंटेफळ करांची मागनी आहे ज्यांच्या जमिनीच्या खरेद्या अगोदर भाजार भावाप्रमाणे झाल्या व सुधारीत भुसंपादनाचा कायदा पास झाल्या नंतर त्याच प्रकल्पासाठी जमिनीची खरेदी ३ पट अधिक किंमतीने होनार आहेत, त्यामधील फरक खुंटेफळ मधील शेतक्यांना मिळावा. कारण प्रकल्प एकच पन काही शेतकर्यांना वेगळा न्याय व दुसऱ्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय हे योग्य नसुन ज्यांनी सुरवातीला शासनास 192 हे. जमिन दिली त्यांना खरे श्रेय या प्रकल्पाचे जात असुन तरि देखील त्यांच्यावर अन्याय होत आहे म्हनुन त्यांच्या पाठीमागे आम आदमी पार्टी खंबीरपने उभा राहील. दोन्ही आमदार सत्तेत असल्यामुळे त्यासंदर्भात लवकरच दोन्ही आमदारांना भेटुन आपन पत्राद्वारे विनंती करनार आहोत की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आपन सरकारला विशेष बजेट टाकुन या शेतकर्यांना न्याय मिळवुन देन्याची मागनी करावी. जरी शासनास शेतक्यांनी खरेदी दिली असेल तरी सरकारच्या मनात आले तर कुठल्याही माध्यमातुन विशेष बजेट टाकुन हा तिढा सुटु शकतो. हे सरकार जनतेच आहे, शेतकर्यांच आहे, गोरगरीबांच आहे तर नक्कीच या अन्यायग्रस्त शेतकर्यांना सरकार दरबारी न्याय मिळेल अशी आशा आहे. यासाठी जर दोन्ही आमदारांनी प्रयत्न केले तर नक्कीच यामधे यश मिळेल. येणाऱ्या काळात यासाठी जर मंत्रालयावर मोर्चा काढन्याची वेळ आली किंवा मु्ख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ आली तर खुंटेफळकर नक्कीच दोन्ही आमदार जिथे बोलवतील तेथे उपस्थित राहतील. असे प्रतिपादन प्रदिप थोरवे यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.