Rodagiri Festival : गुरुवारी संपन्न होणार रोडागिरी बाबा यात्रा उत्सव
आष्टी:- तालुक्यातील हिवरा, डोंगरगण,दादेगाव,भोजेवाडी या गावचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत रोडागिरी बाबांचा यात्रा उत्सव गुरुवारी संपन्न होत आहे.
बाबांच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे,अहमदनगर तसेच तालुक्यातुन मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात व दिवसभर यात्रेचा आनंद लुटतात.चार गावांच्या मानाच्या काठयाची मिरवणूक लेझीम खेळत व ढोल ताशाच्या गजरात निघते.गावभरात शेरणी वाटप केली जाते.जागृत देवस्थान म्हणून भाविक या ठिकाणी नवस करतात.पूर्वी एकेश्वरवादाचा प्रचार व प्रसार करत भारतभर भ्रमण करणाऱ्या सुफी संतापैकीच रोडागिरी बाबा होते.त्यांचे बंधू कड्याचे मौलअली बाबा,धामणगाव चे सय्यद बादशाह बाबा हि देवस्थाने हि आष्टी तालुक्यात प्रसिद्ध आहेत.या ठिकाणी पुरातन दर्गाह वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना पहायला मिळतो.अशी माहिती या दर्गाह वरील मुजावरांनी दिली.
या वर्षी गाड्या पार्किंग ची व्यवस्था टेम्भी आई मंदिरा जवळ करण्यात आली आहे. तसेच मंदिरावर आकर्षक विधुत रोषणाई करण्यात आली आहे.सर्व भाविकांनी शांततेत सहभागी व्हावे असे आवाहन हिवरा, डोंगरगण, दादेगाव सरपंच मंडळींनी केले आहे.
stay connected