Suresh Dhas : यांच्या प्रयत्नाने आष्टी विधानसभा मतदारसंघातील तीन रस्ते कामांना मंजुरी
*****************************
***************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी विधानसभा मतदारसंघातील तीन रस्ता कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत मंजुरी मिळाली आहे अशी माहिती उस्मानाबाद,लातूर,बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
आष्टी तालुक्यातील सावरगाव ते मच्छिंद्रनाथ मंदिर रस्ता ३.५० किलोमीटर आणि राज्यमार्ग ५६१ ते पांढरी ते करंजी रस्ता ३.०० किलोमीटर आणि प्रमुख जिल्हा मार्ग-१ ते गंगादेवी शिरसाठ वस्ती रस्ता ४.५० किलोमीटर या तीन रस्ता कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नांने मंजूर मिळाली आहे.या परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन दळणवळणासाठी दर्जेदार रस्ता उपलब्ध होणार असल्यामुळे या परिसरातील गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून आ.सुरेश धस यांचे आभार व्यक्त केले आहे.वेळोवेळी ग्रामस्थांची होणारी मागणी लक्षात घेता ता रस्त्यांना आपण प्रामुख्याने मंजुर करून घेतले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याने परिसरातील आनंद व्यक्त केला आहे.
stay connected