Marathi News live : जनतेची दिशाभूल केली नाही आणि करणारही नाही...!
त्या निवीदाला स्थगिती दिली नसती तर ५०% काम झाले असते.. आ.बाळासाहेब आजबे
-------------------
संदिप जाधव/आष्टी
खुटेफळ साठवण तलावाच्या भूसंपादनामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झालेला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी,ज्या तालुक्यात जनतेच्या हिताच्या योजना आहेत. त्यामध्ये बाधा आणता कामा नये, असे स्पष्ट प्रतिपादन आ. बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.
आष्टी येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या अधिकाऱ्यांच्या नावावर जमीनी घेऊन कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला आहे. नाव न घेता आम्हालाही तुमचे घोटाळे काढायला लावू नका, मूळ शेतकऱ्यांना पैसे न देता जमीनी घेऊन पैसे लाटायला लागले आहेत, असे सांगत खुटेफळ साठवण तलावाच्या भूसंपादनामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब आजबे यांनी केला आहे.
यावेळी आजबे म्हणाले की,शरद पवार हेच आमचे नेते,आम्ही शरद पवार साहेबांचेच कार्यकर्ते आहोत. तालुक्यातील विकास कामांसाठी अजीत दादा बरोबर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले


stay connected