Crime News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाकडून वडिलांना मारहाण : वडिलांचा मृत्यू आष्टी पोलीसात गुन्हा दाखल

 Crime News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाकडून वडिलांना मारहाण : वडिलांचा मृत्यू आष्टी पोलीसात गुन्हा दाखल



आष्टी ता.१२ (प्रतिनिधी)- मुलाने आपल्या वडिलांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता वडिलांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केलेल्या जबर मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथे शुक्रवारी (ता.७) सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. या प्रकरणी मयताची पत्नी यांनी आष्टी पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.१०) आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. 



शुक्रवारी (ता.७) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील कांतीलाल सूर्यभान नरवडे (वय ५४) यांना त्यांचा मुलगा योगेश कांतीलाल नरवडे यांने दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु  कांतीलाल सूर्यभान नरवडे यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यांचा राग आल्याने योगेश नरवडे याने जन्मदात्या बापाला काठीने जबर मारहाण केल्याने या मारहाणीत वडील कांतीलाल नरवडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृतकाची पत्नी नर्मदाबाई कांतीलाल नरवडे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी (ता.१०) आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे हे करत आहेत.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.